Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

पुन्हा लॅाकडाऊन नको असेल तर बंधने पाळावीच लागतील; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) आढळून आलेल्या कोरोनाच्या (Corona) 'ओमीक्रोन' या नव्या व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली आहे. भारतानेही आता सावध पावले टाकायला सुरूवात केली आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

कोरोनाच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्र सरकारच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, अशा सुचवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसेच विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून संस्था, आस्थापना, नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तोंडावर मास्क न लावणारे, मास्कऐवजी रुमाल वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे, इतर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर ५०० रूपये तर आस्थापनांवर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Jalgaon Collector) यांनी दिले आहेत.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मंगल कार्यालये, सभागृहे बंदिस्त जागेतील कार्यक्रम ५० टक्के क्षमता, खुल्या असलेल्या समारंभासाठी २५ टक्के नागरिकांना उपस्थितीची परवानगी आहे. क्षमता ठरवण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला असणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधित सर्व व्यक्ती, सेवा देणारे तसेच सहभागी होणाऱ्यांचे लसीकरण झालेले आवश्यक आहे. कोणत्याही संमेलन, मेळाव्यासाठी एक हजारापेक्षा जास्त नागरिकांची उपस्थिती असल्यास निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रतिनिधी खात्री करणार आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रतिनिधींना तो कार्यक्रम पूर्णतः किंवा अंशत: बंद करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे उल्लघण करणाऱ्या संस्थानवर ५० हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. टॅक्सी किंवा खासगी वाहतूक तसचे बसमध्ये प्रवास करणाऱ्यांना कोरोना नियमांचे उल्लघन केल्यास व्यक्तीस ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. बसेसच्या मालकांना १० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे कठोर नियम लागू केले जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT