Supriya Sule News
Supriya Sule News Sarkarnama
मुंबई

Supriya Sule News: ना राष्ट्रवादीचा नेता, पदाधिकारी वा कार्यकर्ता; 'काॅमन मॅन'लाही वाटतं पवारांनीच अध्यक्षपदी राहावं..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात विशेषतः राष्ट्रवादी पक्षांतर्गत नेते व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे.

तसेच पवारांनी आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी वरिष्ठ नेतेमंडळींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मनधरणी केली जात आहे. तरीदेखील पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं समोर येत आहे. पण याचवेळी एका सफाई कामगाराला देखील शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहावे असं वाटतंय..

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी एका सफाई कर्मचाऱ्यासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात मुंबईतील एका सफाई कामगारानं देखील शरद पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. सुळे यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

काय घडलं?

खासदार सुप्रिया सुळे नेहमीप्रमाणे बुधवारी(दि.३) मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी संदेश पवार या सफाई कर्मचाऱ्याशी संवाद साधला. यावेळी म्हणाला ताई, कालची पवार साहेबांची बातमी बघितली. त्यांनी राजीनामा दिला. पवारसाहेब यांचे विचार शाहू, फुले, आंबेडकरांचे आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पुन्हा स्वीकारावं. मी सामान्य नागरिक आहे. पण मलाही वाटतं, शरद पवार(Sharad Pawar) साहेबच अध्यक्ष राहावेत अशा भावना सफाई कामगार संदेश पवार यांनी व्यक्त केला.

संदेश पवार हा सफाई कामगार महालक्ष्मीच्या रेसकोर्स येथे राहतो. तो मूळचा राजापूरचा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी सुळे यांनी सफाई कामगाराशी संवाद साधल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी घेतला. यानंतर सुळे यांनी तुम्ही सफाई करता म्हणून मुंबई स्वच्छ राहते. तुम्ही पवारसाहेबांसाठी प्रेम दाखवलं. त्याबद्दल आभार असं खासदार सुप्रिया सुळे त्या व्हिडीओत म्हणाल्या.

अद्यापही राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरुच...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या घोषणेनंतर एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे असे असतानाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार यांच्या मनपरिवर्तनाचं काम सुरु आहे. शरद पवार यांनी किमान २०२४ पर्यंत तरी त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावं अशी आमची मागणी करत आहोत अशी माहिती स्वत: अनिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT