MNS Shiv Sena alliance confusion : महाराष्ट्रासह देशात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा आहेत. पण याचा मुहूर्त कधी? हे दोन्ही ठाकरे बंधूंसह कोणत्याच ज्योतिषाला सांगता येईना. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संभ्रम वाढला आहे.
शिवसेनाच्या वर्धापनदिनानंतर उद्धव ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचा आदेश दिला. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्वबळाची तयारी केल्याचे दिसते. मुंबईत देखील आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकारी हे कामाला लागले असून, ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता मावळली, अशी चर्चा रंगली आहे.
शिवसेना आणि मनसे (MNS) यांच्या युतीबाबत दोन्हीकडील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रम आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या आमदार आणि खासदार आपापल्या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.
मुंबई (Mumbai) महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्धापनदिनानंतर झालेल्या आमदार-खासदारांच्या स्नेहभोजनावेळी दिल्या आहेत.
शिवसेना ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी वर्धापनदिनानिमित्त मुंबईत होते. उद्धव ठाकरेंनी दुसऱ्या दिवशी सर्व आमदार आणि खासदार यांच्याबरोबर स्नेहभोजन घेतले. या वेळी मुंबई महापालिसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याचा निर्धाराबरोबरच मुंबई पूर्व, पश्चिम उपनगर आणि शहराकडे लक्ष देण्याच्या आदेश उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिला. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशामुळे मनसेबरोबर युतीचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज ठाकरेंबरोबर युतीच्या चर्चेबाबत देखील उद्धव यांनी कोणताचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे हा संभ्रम अधिकच वाढला आहे.
राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे; मात्र सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता शिवसेना ठाकरे पक्षात संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाने स्वबळावर लढण्याच्या तयारी सुरू केल्याने राज ठाकरेंच्या मनसेबरोबर युतीची शक्यता मावळलीच असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद वाढवावा, जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपल्या मतदारसंघात प्रयत्न करावा, असा आदेश देताना मी पुढचं पाहून घेतो, असे सांगून उद्धव ठाकरेंनी आमदार, खासदार यांच्यात जोश भरला.
राज्यात निर्माण झालेल्या विविध प्रश्नांवर सत्ताधारी महायुतीला आगामी पावसाळी अधिवेशनात कोंडीत पकडण्यासाठी व्यूहरचना आखण्याचा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार आणि खासदारांना दिले आहेत. शेतकरी कर्जमाफीपासून लाडकी बहीण योजनेसाठी विविध खात्यांचे वळवलेले पैसे, वाढती गुन्हेगारी, महायुतीमधील मंत्र्यांचे एकमेकांवर घोटाळ्याचे आरोप, सर्व मुद्यांचा अभ्यास करण्याचा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.