Chandrashekhar Bawankule Sarkarnama
मुंबई

Kalyan Dombivali BJP: डोंबिवलीत भाजप संकल्प दौऱ्यादरम्यान गोंधळ; तरुणाचा भर कार्यक्रमात बावनकुळेंना सवाल

Chandrashekhar Bawankule: राजकीय नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी केल्यामुळे आरक्षण समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

Ganesh Thombare

Mumbai News: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आंदोलन करत आहे. तसेच राजकीय नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी केल्यामुळे सत्ताधाऱ्यांना आरक्षण समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही या रोषाचा सामना करावा लागला आहे. डोंबिवलीत भाजप संकल्प दौऱ्यादरम्यान काहीसा गोंधळ उडाला. भर चौकात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एका तरुणाने सवाल करत मराठा आरक्षण कधी देणार, असे विचारले. यावर बावनकुळे यांनी 'एक मराठा लाख मराठा', अशी घोषणाबाजी करत तरुणाला स्टेजवर बोलवले.

दरम्यान, हा कार्यक्रम संपल्यावर प्रश्न विचारणाऱ्या तरुणाशी प्रसिद्धी माध्यम संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतानाच भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे या ठिकाणी काही वेळ गोंधळ उडाला. सध्या राज्यभरात अनेक गावात राजकीय नेत्यांना नो एन्ट्री केल्यामुळे अनेक नेत्यांना दौरे रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणावर सरकार काय मार्ग काढतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

भाजपचे कल्याणमध्ये शक्ती प्रदर्शन

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविजय 2024 संकल्प दौऱ्यादरम्यान कल्याणमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी डोंबिवलीतही रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. तसेच या दौऱ्यादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ भाजपकडे ठेवण्याची मागणी केली.

तर यावर जागावाटपाचा निर्णय घेण्याचे अधिकार हे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला आहेत, असे सांगत त्यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप- शिवसेनेत (शिंदे गट) रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT