NCP Political Crisis: अपात्र का करू नये ? विधिमंडळाच्या नोटिशीवर आमदार बाळासाहेब पाटलांची सूचक प्रतिक्रिया

MLA Balasaheb Patil : शरद पवार गटाच्या आठ आमदारांना विधिमंडळाने नोटीस पाठवली असून आठ दिवसांत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.
MLA Balasaheb Patil
MLA Balasaheb Patil Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षात तयार झालेल्या शरद पवार गट आणि अजित पवार गटातील राजकीय संघर्ष वाढला आहे. अजित पवार गटाने पक्षावर दावा सांगितल्यानंतर हे प्रकरण थेट निवडणूक आयोगात पोहचले आहे. अशातच आता शरद पवार गटाच्या आठ आमदारांना विधिमंडळाने नोटीस पाठवली असून या आमदारांना आठ दिवसांत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनाही नोटीस आली आहे. त्यामुळे बाळासाहेब पाटील यावर, काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. मात्र, त्याआधी त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण हे तीन आमदार अजित पवार गटात आहेत. तर आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील हे तिघे शरद पवार गटात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Balasaheb Patil
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुप्रिया सुळे-जयंत पाटील घेणार राज्यपाल बैस यांची भेट

दोन्ही गटाकडून सध्या आमदार अपात्रतेबाबत नोटीस पाठविण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून बाळासाहेब पाटील यांना नोटीस आली आहे. सध्या तरी पाटील यांनी याबाबत अधिक बोलणे टाळले आहे. राष्ट्रवादीचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याबाबत 30 आक्टोबरला निकाल अपेक्षीत आहे. त्यामुळे नोटीशीवर आत्ताच बोलणे उचित नाही, अशी प्रतिक्रिया आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

याचिकेच काय म्हटले आहे ?

पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये ? अशी याचिका अजित पवार गटाने विधिमंडळात दाखल केली होती. या याचिकेवर म्हणणं मांडण्यासाठी विधिमंडळाने आता शरद पवार गटातील आमदाराना नोटीस पाठवली आहे. या आमदारांना यावर आठ दिवसांत म्हणणे मांडण्याची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे आता आमदार काय म्हणणं मांडतात, हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

MLA Balasaheb Patil
Maratha Reservation: मराठा आरक्षण का टिकलं नाही? शंभूराज देसाईंना नक्की म्हणायचं काय...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com