Vaibhav Naik, Narayan Rane Sarkarnama
मुंबई

राणे-नाईकांच्या भांडणात काँग्रेसला लॉटरी; दोन नगरसेवक अन् थेट मिळवलं नगराध्यक्षपद

कुडाळ ही नगरपंचायत एका मताने भाजपच्या हातून निसटली असून महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : कुडाळ (Kudal) नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या भांडणात काँग्रेसची (Congress) चांदी झाली असून केवळ दोन नगरसेवक असतानाही पक्षाला नगराध्यक्षपद मिळालं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यातील वादात काँग्रेसची लॉटरी लागल्याने राज्यभर त्याचीच चर्चा रंगली आहे.

कुडाळ ही नगरपंचायत (Nagar Panchayat Election) एका मताने भाजपच्या (BJP) हातून निसटली आहे. नगराध्यक्षपदी काँग्रेसचे आफ्रीन करोल यांची निवड झाली आहे. करोल यांना या निवडणुकीत नऊ तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना आठ मतं मिळाली. कुडाळमध्ये एकूण 17 पैकी आठ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. तर शिवसेनेला सात व काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या.

नगरपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी नऊ आकडा कोणत्याच पक्षाला गाठता आला नाही. त्यामुळे काँग्रसेच्या दोन नगरसेवकांवरच शिवसेना (Shiv Sena) व भाजपचं गणित अवलंबून होतं. पण वैभव नाईक यांनी राणेंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेसला नगराध्यक्षपदाची ऑफर दिली. त्यामुळं राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील हे दोन्ही पक्ष नगराध्यपदाच्या निवडणुकीत एकत्र आले.

निवडणुकीत अखेरच्या क्षणी चमत्काल घडेल, असा दावा भाजपकडून केला जात होता. पण महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी हा दावा फोल ठरवत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. कुडाळ विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असून वैभव नाईक आमदार आहेत.

राणेंनी सिंधुदुर्ग बँकेत सत्ता मिळवल्यानंतर कुडाळ नगरपालिकेसाठीही राणे व नाईक यांच्यात जोरदार लढत होती. मागील निवडणुकीत भाजपला या नगरपंचायतीत नऊ जागा मिळाल्या होत्या. एकुण 17 जागा असलेल्या या नगरपालिकेत भाजपला पुन्हा हा जादुई आकडा गाठता आलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT