RSS BJP Congress Sarkarnama
मुंबई

RSS BJP Congress political clash : 'संघाचा विचार फुटीरतावादी'; श्यामाप्रसाद मुखर्जींच्या उपमुख्यमंत्रीपदाचा हर्षवर्धन सपकाळांनी 'इतिहास'च काढला

Harshwardhan Sapkal Congress Slams RSS, BJP, and Eknath Shinde Shiv Sena in Mumbai : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला.

Pradeep Pendhare

Congress Maharashtra : "काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा आहे, तर भाजप व राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा पाकिस्तान निर्मितीच्या विचाराला पाठबळ देणारा आहे.

मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये भाजप नेते श्यामाप्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोर्चाच काढायचा, तर तो फडणवीसांच्या बंगल्यावर काढावा", असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजपने (BJP) काँग्रेसविरोधात मोर्चे काढले. टिळक भवनवर निघालेला हा मोर्चा मुंबईत इंडिया बुल्स इथं पोलिसांनी अडवला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या मोर्चावर जोरदार टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुरता इतिहासच सपकाळ यांनी मांडला. श्यामाप्रसाद मुखर्जी कोणत्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, याची आठवण करून देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चांगलाच डिवचलं.

हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले, "भाजपने मोर्चा त्यांच्याच सरकारमध्ये असलेल्या एका मंत्र्याच्या घरावर काढायला हवा होता. या मंत्र्याचे भाऊ ‘हू किल्ड करकरे?’ पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकात सर्व गोष्टींचा ऊहापोह आहे. आरएसएसचा थेट संबंध कसा आहे, हेही त्यात लिहिलेले आहे". हा मोर्चा काँग्रेस कार्यालयावर आलाच असता, तर त्यांना सामोरे जाऊन हे पुस्तकही त्यांना भेट दिले असते, असा टोला सपकाळ यांनी लगावला.

मालेगाव स्फोटाच्या निकालावरून टोला

रेल्वे बॉम्बस्फोटातील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने लगेच जाहीर केला; पण मालेगाव प्रश्नी अद्याप सरकारने भूमिका घेतली नाही. मालेगाव प्रकरणात फडणवीस सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार का? हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान सपकाळ यांनी दिले.

भाजपचा दुपट्टीपणा

आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल महाराष्ट्राला नितांत आदर आहे. ते देशासाठी हुतात्मा झाले. दरवर्षी 26/11ला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालता आणि आता त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करता, हा भाजप, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांचा दुपट्टीपणा आहे, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

मालेगाव निकालाबाबत शंका

मालेगाव प्रकरणात आरोपपत्र कसे बदलले, या खटल्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांना प्रकरण सौम्य करण्यास कोणी सांगितले होते, या घटनाक्रमांची नीट सांगड घालून पाहावे, असे सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी निकालाबाबत शंका व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT