Fadnavis Tambe beyond politics : फडणवीस अन् तांबेंची मैत्री; बीज कुणी पेरलं? भाजप सोडा काँग्रेसचीही नाही आडकाठी!

Devendra Fadnavis and Satyajeet Tambe Maintain Friendship Beyond Politics : सीएम देवेंद्र फडणवीस आणि आमदार सत्यजीत तांब यांच्या राजकारणा पलीकड जपलेली मैत्री चर्चेत.
Fadnavis Tambe beyond politics
Fadnavis Tambe beyond politicsSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis Satyajit Tambe friendship : महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीचे राजकारण सुरू झाल्यानंतर, राजकीय मैत्रीचा पोत देखील बिघडला आहे. महाराष्ट्राला राजकीय मैत्री जपण्याची मोठी परंपरा आहे. यात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अन् शरद पवार यांच्या मैत्रीचं आजही दाखले दिले जातात.

आज 'मैत्री दिन', यानिमित्ताने राजकीय मैत्रींचा ऊहापोह केला जात आहे. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचा राजकीय वारसा असलेल्या संगमनेरमधील नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या मैत्रीच्या किश्यांना उजाळा मिळू लागला आहे. भाजपच सोडा काँग्रेसही या राजकीय मैत्रीला आडकाठी ठरत नाही, अशी ही मैत्री आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे हे काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजीत तांबे युवा आमदार असले, तरी त्यांची कार्यपद्धती राज्यावर छाप पाडते. सर्व पक्षीय नेत्यांबरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. यातल्या यात भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेली मैत्री ही दोन्ही नेत्यांच्या पक्षाच्या पलीकडची असल्याचे वेळोवेळी समोर आलं आहे. या मैत्रीला सुरवात कशी झाली, हे सत्यजीत तांबे खूप हळवे होतात.

नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पहिली भेट, अन् पुढं मैत्री झाली. दिवंगत नेते राजीव राजळे फडणवीस अन् तांबे यांच्या मैत्रीचे कारण. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत नेते राजीव राजळे युवकांमध्ये लोकप्रिय होते. आमदार सत्यजीत तांबे जसे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे, तेच नातं राजीव राजळे यांचे थोरातांशी होते.

Fadnavis Tambe beyond politics
Maharashtra Congress : काँग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीत श्रीरामपूरला 'लॉटरी' अन् 'मोठी जबाबदारी'

बाळासाहेब थोरात यांची भाचेसून म्हणजे, राजीव राजळे यांची पत्नी मोनिका राजळे भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघातून त्या विधानसभेचं प्रतिनिधीत्व करतात. राजीव राजळे आणि सत्यजीत तांबे हे मावस बंधू. भाऊ जरी असले, तरी दोघांमध्ये भावापेक्षा मैत्री घट्ट!

Fadnavis Tambe beyond politics
Gotya Gitte Video : 'गोट्या गित्ते आत्महत्या करणार....' नव्या व्हिडिओतील दाव्याने सगळेच चक्रावले

राजीव राजळे उच्च शिक्षित. आर्किटेक्चर. पण त्यांनी कधी उच्च शिक्षणाचा 'इगो' नव्हता. गावचं समाजकारण ते अधिक रस घेऊन करायचे. गावातील राजकारण ते जमिनीवर मांडी घालून करायचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार तांबे यांचा झालेला संपर्क अन् पुढची मैत्री राजीव राजळे यांच्यामुळेच झाली.

राज्यात 'यूथ फोरम आमदार' म्हणून ग्रुप आहे. या ग्रुपचे संस्थापक देवेंद्र फडणवीस आहेत. या ग्रुपमध्ये निवडून येणारा युवा आमदार इन होतो, तर पडणारा आमदार बाहेर पडतो. या ग्रुपमुळे देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमदार तांबे यांचा संबंध आला. पुढे फडणवीस अन् तांबे यांची मैत्री राजकारणापलीकडे गेल्याचं वेळोवेळी राज्याला अनुभव आला.

तांबेंविरोधात फडणवीसांनी उमेदवार दिला नाही

नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी सत्यजीत तांबे अपक्ष लढले. त्यात ते विजयी झाले. परंतु भाजप महायुतीने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीमुळेच सत्यजीत तांबेविरोधात उमेदवार दिला नसल्याची त्यावेळी चर्चा होती. इथं सत्यजीत तांबेविरुद्ध महाविकास आघाडी, असा 'सामना' झाला. या निवडणुकीत 'जीत' सत्यजीत तांबे यांची झाली.

तांबेमुळे फडणवीस अन् थोरात एकत्र

तत्पूर्वी सत्यजीत तांबे यांनी कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर, गॅविन न्यूसम यांनी लिहलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचा अनुवाद केला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना हजेरी लावली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर उपस्थित होत्या.

फडणवीसांची सूचक ऑफर

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात तुमच्याकडे तक्रारीच्या सुरात सत्यजीत सारखा नेता, तुम्ही बाहेर ठेवू नका. नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसं जमाच करायची असतात, असं म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे सत्यजीत तांबेंना भाजपमध्ये येण्याची ऑफरच दिली.

तांबेंचं काँग्रेस नेत्यांना चॅलेंज

थोरात अन् तांबे घराण्याला काँग्रेसची परंपरा आहे. परंतु नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी तांबे यांना काँग्रेसकडून वेगळाच अनुभव आला. तेव्हापासून आमदार सत्यजीत तांबे हे काँग्रेसवर नाराज आहेत. मध्यंतरी, 'काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधींना महाराष्ट्रातील नेत्यांनी फोन करून एका तासांत भेटून दाखवावं', असे चॅलेंज आमदार तांबेंनी दिलं होतं. आमदार तांबे यांच्या या विधानावरून राज्यासह देशात गदारोळ झाला होता.

मैत्रीला आडकाठीच नाही...

या विधानावरून, तर आमदार तांबे लवकरच भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा रंगली होती. पण, आमदार तांबेंनी अजून तसा काही निर्णय घेतलेला दिसत नाही. परंतु भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सत्यजीत तांबे या दोघांनी राजकीय पक्षापलीकडे जात मैत्री जपली आहे. विशेष म्हणजे, या दोघांच्या मैत्रीला भाजप अन् काँग्रेसकडून देखील अजून आडकाठी आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com