Chhatrapati Shivaji Maharaj Statue Sarkarnama
मुंबई

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : "माफी मागायची सोडून...", शिवाजी महाराज पुतळा प्रकरणावरून काँग्रेस नेत्याचे PM मोदी अन् CM शिंदेंवर टीकास्र

Jagdish Patil

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या घटनेतून सरकारचा भ्रष्ट कारभार समोर आला असून या प्रकरणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ते करत आहेत.

अशातच आता या पुतळ्याचं उद्घाटन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी पंतप्रधानांनी ज्या ज्या गोष्टींचं उद्घाटन केलं आहे. त्या त्या गोष्टी कोसळत असून हा एक प्रकारचा नियतीचा संकेत असल्याचा टोला लगावला आहे.

दलवाई म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) ज्या ज्या गोष्टींचं उद्घाटन करत आहेत, त्या सर्व गोष्टी कोसळत आहेत. एकप्रकारे हा नियतीचा संकेत आहे. राम मंदिर, अटल सेतू, संसद भवन आणि आता शिवाजी महाराजांचा पुतळा या सगळ्यांला काही ना काही झालेलं आहे."

सरकारला घरी पाठवणार

तसंच समुद्रकिनारी उभा केलेला हा पहिलाच पुतळा आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, हा काय पहिला पुतळा आहे का की जो समुद्रकिनारी उभा केला आहे? असे अनेक पुतळे आहेत मग हाच कसा कोसळतो? असा प्रश्न दलवाई यांनी उपस्थित केला. शिवाय दिपक केसरकर म्हणताहेत की, आम्ही 100 फुटांचा पुतळा उभा करू, आता तुम्ही काहीही करू नका, कारण लोक तुमच्या सरकारला घरी पाठवणार आहेत. आता आम्ही पुतळा उभा करू, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुतळा कोसळला त्याप्रकरणी माफी मागायची सोडून जबाबदारी झटकत आहेत. ते या गोष्टी नौदलावर ढकलत असतील तर त्यांना असं म्हणायचं आहे का की, ही पंतप्रधान यांची जबाबदारी आहे. असं असेल तर मोदींनी राजीनामा द्यावा, असं म्हणत दलवाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT