Chhatrapati Shivaji Maharaj Statue : महाराजांचा अनादर करणारे लाडक्या बहिणींवर बोलतात...राऊत कडाडले

Sanjay Raut On sindhudurg shivaji maharaj statue : "एकनाथ शिंदेंनी मर्जीतल्या लोकांना या पुतळ्याच्या बांधकामाचं कंत्राट दिलं होतं. या कामात भ्रष्टाचार झाला आहे. पुतळा पडल्यानंतर शिंदे सरकारच्या चेहऱ्यावर थोडंही दु:ख दिसत नव्हतं. सरकार वारा होता असं सांगून कोणाला मूर्ख बनवत आहे?"
Sanjay Raut On Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Sanjay Raut On Chhatrapati Shivaji Maharaj StatueSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील (sindhudurg) मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी (ता.26 ऑगस्ट) कोसळला. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर विरोधकांनी सरकारवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे.

अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच शिवरायांचा असा अपमान मुघलांनी देखील केला नाही, शिवाजी महाराज यांचे लाडके झाले नाहीत आणि हे लाडक्या बहि‍णींचं बोलतात, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मर्जीतल्या लोकांना या पुतळ्याच्या बांधकामाचं कंत्राट दिलं होतं. या कामात भ्रष्टाचार झाला आहे. पुतळा पडल्यानंतर शिंदे सरकारच्या चेहऱ्यावर थोडंही दु:ख दिसत नव्हतं. सरकार वारा होता असं सांगून कोणाला मूर्ख बनवत आहे? 1933 साली गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवला आजही तो तसाच आहे.

Sanjay Raut On Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Sindhudurg Assembly Election: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड कोण राखणार; ठाकरे सेना अन् भाजप पुन्हा आमनेसामने

1956 साली प्रतापगडावर पंडीत नेहरूंनी अनावरण केलेला पुतळा तसाच आहे. तिथेही वारा आहे. पण आठ महिन्यात सिंधुदुर्ग (sindhudurg) किल्ल्यावरील पुतळा कोसळला, असे संदर्भ देत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. बेईमान गद्दार सरकारने चांगल्या मनाने नाही तर राजकारणी मनाने तो पुतळा बनवला होता.

मी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतो कारण ते महाराष्ट्राच्या भावनांशी खेळले आहेत. या लोकांनी महाराजांना देखील सोडलं नाही. या कामात देखील लाखोंचा घोटाळा केला, अरे शिवाजी महाराजांना तरी सोडा", असं म्हणत, ज्यांचे शिवाजी महाराज लाडके झाले होऊ शकले नाहीत, ते लाडक्या बहीणींच्या गोष्टी करतायत, महाराष्ट्र शांत बसणार नाही, अशा शब्दात राऊतांनी सरकारवर निशाणा साधला.

Sanjay Raut On Chhatrapati Shivaji Maharaj Statue
Statue Shivaji Maharaj: चौकशीसाठी फक्त दोन दिवस खूप, एसआयटी-फिसायटीची गरजच नाही; सत्यजीत तांबे संतापले

तसंच, पुतळ्यासंदर्भात केलेला भ्रष्टाचार आम्ही जनतेला सांगणार आहोत. समुद्रावर हवा जास्त नाही तर हवा त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. या घटनेमुळे राज्यावर मोठा आघात झाला आहे. अनेक पुतळे किल्ल्यावर आणि राज्यात आहेत मात्र ते पडले नाहीत हा पुतळाच कसा पडला समुद्रावर वारा असणारच, वाऱ्याची कारणं कसली देता? तुमच्या डोक्यात हवा गेली आहे. तसेच मर्जीतल्या ठेकेदारांना कंत्राट देऊन घाईघाईत मोदींच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com