Vijay Wadettiwar On Bjp Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar On Bjp : खासदार वायकरांना 'क्लीन चिट'; विजय वडेट्टीवार म्हणाले, 'भ्रष्ट भाजपच्या 'वॉशिंग मशीन'ची समज जनतेला'

Vijay Wadettiwar Vs MP Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटळ्यात मुंबई आर्थिक गु्न्हे शाखा पोलिसांनी खासदार रवींद्र वाकयकर यांनी 'क्लीन चीट' देताच, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

Pradeep Pendhare

Vijay Wadettiwar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई आर्थिक गु्न्हे शाखेने 'क्लीन चिट' देताच, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल सुरू केलाय. काँग्रेस नेता विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी भ्रष्ट भाजपच्या 'वॉशिंग मशीन'ची समज योग्य प्रकारे जनतेला आहे, असा टोला लगावला.

विशेष म्हणजे, गैरसमजातून गुन्हे दाखल होतात, ही बाब पहिल्यांदाच महाराष्ट्राला कळाल्याचे देखील उपरोधात्मक टिप्पणी केली. हा गुन्हा दाखल होताच रवींद्र वायकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची साथ सोडत शिवसेना एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते.

विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी त्यांनी ट्विट करत खासदार रवींद्र वायकर यांना दिलेल्या क्लिन चिटवरून भाजपवर निशाणा साधला आहे. पोलिसांच्या गैरसमज कारभाराची महाराष्ट्रातील जनतेला योग्य समज आहे. ऐका हो ऐका, आणखी एका 'पलटी मार' नेत्याला क्लीन चिट देऊन स्वच्छ करून घेण्यात आले आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केले आहे.

मुंबई महापालिकेकडून जोगेश्वरी भूखंडप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीतून रवींद्र वायकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मुंबई आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी (Police) रद्द केला आहे. भूखंड घोटाळा प्रकरणात गैरसमजातून गुन्हा दाखल झाल्याचा अहवाल मुंबई आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी दिल्याच्या मुद्यावर विजय वडेट्टीवार यांनी गैरसमजातून गुन्हे दाखल होतात, ही बाब पहिल्यांदाच महाराष्ट्राला कळाली. इतक्या उच्च प्रतीचे काम पोलिस करत आहे. हा देखील विक्रम महायुती सरकारच्या काळातच झाला आहे, हे विशेष!, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

गैरसमजातून असे अजून कोणते गुन्हे दाखल झाले आहेत, याची विचारणा करताच गैरसमजातून असे अजून किती गुन्हे मागे घेण्यात येणार? असा प्रश्न देखील विजय वडेट्टीवार यांनी केला. गैरसमजातून फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल होतात का? गैरसमजातून गुन्हे दाखल करण्याची समज पोलिसांना कोणी दिली? याचे उत्तर त्यांनी सत्ताधारी भाजपकडे मागितले. पोलिसांचा गैरसमज होत असला तरी महाराष्ट्रातील जनतेला भ्रष्ट भाजपच्या 'वॉशिंग मशीन'ची समज योग्य प्रकारे आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT