Video Aaditya Thackeray : ते मंत्रालयाची जागाही गुजरातला देतील; आदित्य ठाकरेंनी सरकारला झोडपले

Aaditya Thackeray On Budget : आदित्य ठाकरे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या महाराष्ट्र द्वेषावर कडाडले आहेत. हे सरकार सत्तेत राहिल्यास मंत्रालयाची जागा देखील गुजरातला देऊन टाकतील, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Aaditya Thackeray on Shinde Government : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणावर आज बाजू मांडली. यावर विरोधकांनी जोरदार प्रहार केले. युवा सनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारचे गुजरात प्रेम हे महाराष्ट्रासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. "हे सरकार सत्तेत राहिले, तर महाराष्ट्राच्या मंत्रालयाची जागा देखील गुजरातला देतील", असा गंभीर आरोप केला.

मुंबईमधील मोक्याची जागा आदानी समूहाला दिल्या जात आहेत. गुजरातकडे महाराष्ट्र सरकार वळाले आहे. गुजरात सांगेल तसे हे महाराष्ट्राचे सरकार काम करत आहे. असेच चालू राहिल्यास हे सरकार महाराष्ट्र मंत्रालयाची जागा देखील गुजरात व्यापाऱ्याला देऊन टाकतील, असा घाणाघात आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईत आणि राज्यात उद्योजकांनी उद्योग करावा. समृद्धी आणावी. रोजगार वाढावा. नोकरी वाढवाव्यात, याला आमचे सहकार्य आहे. परंतु मुंबई आणि महाराष्ट्र गिळण्याचे उद्योग करू नये, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. मुंबई महापालिका बेस्ट आर्थिक सहकार्य करत नाही. ते बेस्ट ऐवजी इतर गोष्टींना आर्थिक सहकार्य करत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. मुंबई महानगरपालिका एमएमआरडी आणि रेस कोर्सला पैसे देत आहे. रेस कोर्सवर असलेल्या घोडे मालकांच्या तबेल्यांसाठी 100 कोटी रुपये खर्च करत आहे. परंतु, बीएसटीला नवीन बसेस घेण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आर्थिक सहकार्य केले जात नाहीये.

Aaditya Thackeray
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत कोणाचा होणार गेम; 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

काल टीम इंडियाची रॅली काढण्यासाठी गुजरातमधून गुड्स कॅरिअरची बस आणण्यात आली होती. 2007 मध्ये अशीच रॅली काढण्यासाठी मुंबईच्या बेस्टच्या बसचा वापर करण्यात आला होता. आता देखील तो करता आला असता. भाजपच्या (BJP) मनात महाराष्ट्रद्वेष एवढा का आहे, हेच कळत नाही. गुजरातवर भयंकर प्रेम करा, परंतु महाराष्ट्राचा द्वेष करू नका, अशी अपेक्षा यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

विधिमंडळाच्या बाहेर करण्यात आलेली सत्ताधाऱ्यांच्या बॅनरबाजीवर देखील आदित्य ठाकरे यांनी टीका केली. या बॅनरवर खोके वाल्यांचे किंवा गद्दारांचे फोटो लावण्यापेक्षा टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो लावायला पाहिजे होते. हा टीम इंडियाचा अपमान आहे.

Aaditya Thackeray
Maharashtra Legislature: टीम इंडियातील चार खेळाडू विधिमंडळाच्या 'मैदानात' ; विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये स्वागतासाठी रस्सीखेच

मुंबई लुटण्याचा कार्यक्रम भाजपकडून सर्रासपणे सुरू आहे. राज्यात तीन महिन्यांनंतर आमचे सरकार आल्यानंतर या सर्वांची आम्ही चौकशी लावणार आहोत. भ्रष्टाचारांमध्ये जो कोणी सहभागी असेल, त्याला आम्ही तुरुंगात टाकणार आहोत, असा इशारा हे आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला. लोकसभेमध्ये जनतेने निकाल दिला आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपची लूट चालणार नाही. तसाच निकाल विधानसभेला देखील जनता देणार असल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com