Rahul Gandhi Breaking News Sarkarnama
मुंबई

Nana Patole News : राहुल गांधी-ठाकरे भेटीबाबत नाना पटोलेंनी स्पष्टचं सांगितलं..; विरोधकांची मोट..

Rahul Gandhi - Uddhav Thackeray Meet : राहुल गांधी हे लवकरच मुंबईत येणार आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Congress Nana Patole on Rahul Gandhi Over Uddhav Thackeray Meet : काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी हे लवकरच मुंबईत येऊन ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेणार असल्याची चर्चा आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खुलासा केला आहे. पटोले माध्यमांशी बोलत होते.

राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी काल (शुक्रवारी) दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर विरोधी पक्षाची आघाडी मजबूत असून आम्ही भाजपविरोधात एकत्रितपणे लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यानंतर राहुल गांधी हे लवकरच मुंबईत येणार असून ते 'मातोश्री'येथे येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आली आहे. "उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत राहुल गांधींचा असा कोणताही कार्यक्रम नाही. राहुल गांधी भाजपविरुद्ध विरोधकांची मोट बांधत आहेत," असे सांगत नाना पटोलेंनी ठाकरे-गांधी यांच्या भेटीची शक्यता फेटाळून लावली आहे.

"राहुल गांधी-उद्धव ठाकरे भेटीबाबत अजून काहीही ठरलेले नाही. राहुल गांधी हे मुंबईत येणार असल्याचा कोणताही प्रोग्राम सध्या तरी नाही. याआधी देखील वेणुगोपालजी महाराष्ट्रात येणार असल्याचे आम्हाला माध्यमांकडून कळले," असे पटोले म्हणाले.

काही दिवसापूर्वी स्वातंत्रवीर सावरकरांच्या विषयावरुन महाविकास आघाडीतील धूसफुस चव्हाट्यावर आली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा माफीवीर असा उल्लेख केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर काँग्रेसकडूनही नाराजीचे सूर उमटल्याचे बोलण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर येणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहेत.

काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणूगोपाल हे सोमवारी मुंबईत येणार आहेत. मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि के.सी. वेणूगोपाल यांची भेट होणार आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली आहे. 2024 संपूर्ण विरोधक एकत्र असणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 2024च्या पंतप्रधान पदासाठी कोण चेहरा असणार, यावरही राऊतांनी स्पष्ट भाष्य केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT