Karnataka Election 2023 : वडीलांची राजकीय गादी जिंकण्यासाठी सख्ये भाऊ आमने-सामने

Karnataka Assembly Election 2023 : सोरब विधानसभा मतदारसंघात ही अनोखी लढत होत आहे.
Karnataka Assembly Election news update
Karnataka Assembly Election news updateSarkarnama

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.  काँग्रेस, भाजपने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत एक लक्षवेधी लढत होत आहे. या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस बंगारप्पा यांची दोन्ही मुले आपल्या वडीलांचा राजकीय वारसा मिळविण्यासाठी आमने सामने उभे ठाकले आहेत. शिमोगा जिल्ह्यातील सोरब विधानसभा मतदारसंघात ही अनोखी लढत होत आहे. कुटुंबातील अंतर्गत वादामुळे हे दोन्ही भाऊ प्रतिस्पर्धी आहेत.

Karnataka Assembly Election news update
Sharad Pawar Reaction: अजितदादा भाजपमध्ये जाणार ? दमानियांच्या टि्वटवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया..म्हणाले..

एस बंगारप्पा यांचा एक मुलगा आपल्या वडीलांचा पारंपारिक पक्ष काँग्रेसमधून तर दुसरा मुलगा भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात आहे. कुमार बंगारप्पा आणि मधु बंगारप्पा याच्यात ही लढत होत आहे.

भाजपच्या तिकीटावर कुमार बंगारप्पा हे दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी मैदानात आहेत, तर येथून काँग्रेसच्या तिकीटावर त्याचे लहान बंधू मधू त्यांच्याशी ठक्कर देत आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदार संघात कुमार यांनी मधू यांचा ३ हजार २८६ मतांनी पराभव केला होता. 1967 से 1994 या काळात या मतदारसंघाचे नेतृत्व त्यांचे वडील एस बंगारप्पा यांनी केले होते.

Karnataka Assembly Election news update
Karnataka Elections 2023 : भाजपने दुसऱ्या यादीतही माजी मुख्यमंत्री शेट्टार यांना डावलले ; येदियुरप्पांचे पक्षश्रेष्ठींकडे साकडे

२०१८ च्या निवडणुकीच्या पूर्वी कुमार हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले होते. त्याच वेळी सोरबचे आमदार मधू जद(एस) हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होते. मधु बंगारप्पा यांनी २०२१ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. एस बंगारप्पा असताना २००४ मध्ये ते आमने-सामने होते.

Karnataka Assembly Election news update
Karnataka Assembly Election : माजी उपमुख्यमंत्र्याच्या विरोधात RSSचा पाठिंबा असलेले IAS अनिल कुमार रिंगणात..

१९९६ (पोटनिवडणुक), १९९९, २००४, २०१८ असे चार वेळा या मतदारसंघातून कुमार हे निवडून आले आहेत. मधू यांनी २०१३ मध्ये येथे बाजी मारली होती. दोन्हीही भाऊ कन्नड चित्रपट उद्योगात सक्रीय आहेत. कुमार यांनी अभिनेता म्हणून काम केले आहे, तर मधू हे अभिनेता, निर्माते आहेत.

काल (गुरुवारी) अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी २२१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजप २७, काँग्रेस २६, आम आदमी पार्टी १०, बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) १, जनता दल (सेक्युलर) १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. तर अन्य १००, तर अपक्ष ४५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com