K. C. Venugopal, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

K.C. Venugopal at Matoshri : उद्धव ठाकरेंच्या पाठिशी काँग्रेस खंबीरपणे उभी; वेणुगोपाल यांनी दिला शब्द

Uddhav Thackeray News : भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारण रोखण्यासाठी एकत्र

सरकारनामा ब्युरो

K.C. Venugopal Meets Uddhav Thackeray : देशात अराजकता माजली आहे. भाजप मनमानी पद्धतीने कारभार करीत आहे. शिवसेनेत फूट पाडण्यासाठी भाजपने कारस्थान केले. अशा घटनांमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या हुकूमशाहीविरोधात उद्धव ठाकरे लढाई लढत आहेत. त्यांच्या पाठिशी काँग्रेस खंबीरपणे उभी राहिल, असा शब्द काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपल यांनी दिला.

महाविकास आघाडीत (MVA) अनेक मुद्द्यांवर एकमत होत नव्हते. त्यातच माजी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकर यांच्यावरून केलेल्या विधानावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर वेणुगोपाल यांनी मातोश्रीवर येत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लोकशाही वाचविण्यासाठी सर्व विरोधक एकत्र लढणार असल्याचे के. सी. वेणुगोपाल (K.C. Venugopal) यांनी जाहीर केले.

वेणुगोपाल म्हणाले, "देशात भाजपविरोधात राहुल गांधी यांनी मोहीम उघडली आहे. त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाजपचा सामना करीत होते. त्यांचा पक्ष हिरावून घेण्यात आला. ठाकरे मोदी-शाह यांच्याविरोधात लढत असलेल्या लढाईचे आपण साक्षीदार आहोत. सध्या राज्यातील राजकीय स्थिती अस्थिर आहे. देशातही अनेक मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. भाजपच्या या कारभाराविरोधात मोहीम उघडण्यासाठी राहुल यांनी देशातील विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. लोकशाही वाचविण्याासाठी आता सर्व विरोधक एकत्र आले आहेत."

यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी भाजपवर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, सध्या देशासमोरील अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. या फोडाफोडीविरोधात विरोधकांचे समिकरण सुरू आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले होते सर्व पक्ष संपतील आणि एकच राहील. देशात हाच एक मोठा धोका आहे. भाजपने शिवसेनेत गद्दारी करवली आता त्यांचा डोळा इतर पक्षांकडे आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकतीने एकत्र लढणार आहोत. आम्ही मैत्री केली नाते निर्माण करतो. तसेच नाते भाजपसोबतही केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT