Bhiwandi Mahanagarpalika  Sarkarnama
मुंबई

काँग्रेसला मदत करताच भाजपचे 9 नगरसेवक अपात्र ठरणार? महापौर निवड राहिलेल्या एकमेव महापालिकेतील सत्ता संघर्षात पुन्हा ट्विस्ट

Bhiwandi mayor election News : महापौर निवड बाकी असलेल्या एकमेव महापालिकेत सत्ता संघर्ष तीव्र झाला आहे. काँग्रेसला मदत केल्याच्या आरोपांमुळे भाजपचे 9 नगरसेवक अपात्र ठरणार का? जाणून घ्या संपूर्ण घडामोडी.

Rashmi Mane

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिकेच्या महापौर निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्तासंघर्षात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राज्यातील महापौर निवड बाकी असलेली ही एकमेव महापालिका असल्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. मात्र ऐनवेळी उमेदवार बदल आणि त्यानंतर सुरू झालेल्या हालचालींमुळे वातावरण अधिकच तापले आहे.

महापालिकेत एकूण 90 जागा आहेत आणि बहुमतासाठी 46 चा आकडा आवश्यक आहे. निवडणुकीनंतरच्या आकडेवारीनुसार काँग्रेसकडे 30, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे 12 जागा आहेत. या दोन्ही पक्षांनी एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली असून त्यांची एकत्रित ताकद 42 इतकी होते. त्यांना बहुमतासाठी आणखी 4 जागांची गरज आहे.

दरम्यान, भाजपने महापौर पदासाठी आधी नारायण चौधरी यांचे नाव पुढे केले होते. मात्र शेवटच्या क्षणी पक्षाने उमेदवारीत बदल करत स्नेहा मेहुल पाटील यांना संधी दिली. या निर्णयामुळे नारायण चौधरी यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली. त्यांच्या गटातील 9 नगरसेवकांनी स्वतंत्र भूमिका घेत काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असल्याची चर्चा आहे.

या घडामोडीमुळे आणखी एक प्रश्न उपस्थित झाला आहे. जर भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले 9 नगरसेवक काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करत असतील, तर त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई होऊ शकते का? अपात्र ठरणार का? अपात्रतेचा मुद्दा पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मतदान केल्यास सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या नगरसेवकांच्या पुढील राजकीय वाटचालीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे भाजपकडे 22, शिवसेनेकडे 12 अशा 34 जागा होत्या. याशिवाय समाजवादी पक्ष 6, कोणार्क विकास आघाडीकडे 4, भिवंडी विकास आघाडीकडे 3 आणि इतर 1 जागा आहे. यातील समाजवादी पक्ष आणि कोणार्क विकास आघाडीने शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका घेतली आहे.

आता यातील 9 नगरसेवक भाजपपासून दूर गेले, तर भाजप आघाडीची कमी होऊ शकते आणि सेक्युलर फ्रंटची स्थिती अधिक मजबूत होईल. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. संपूर्ण घडामोडींमुळे भिवंडीतील राजकारण अधिकच रंगतदार झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT