Mumbai News : शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर या दोघांचा फोटोसोबत औरंजेबासोबत फोटो असलेला बॅनर अज्ञात इसमाकडून लावण्यात आले आहेत. अशा आशयाचे बॅनर माहीम परिसरात लावले गेले होते. यानंतर परिसरात खळबळ पाहायला मिळाली. आता ठाकरे गटाकडून हे बॅनर हटवण्यात आले आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून त्या अज्ञात व्यक्तिंचा शोध घेण्यात येत आहे. (Controversial Banner Of Uddhav Thackeray in Mahim)
प्रकाश आंबेडकर यांनी तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली होती. यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. तसेच उद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे का? असा प्रश्न देखील भाजपच्या वतीने विचारण्यात आला होता. यामुळे मुंबई महानगरपालिका आणि लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसात होणार असल्याने आतापासूनच वातावरण निर्मिती होत आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं समीकरण बनल्यापासून भाजपकडून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडले अशा प्रकारची टीका वारंवार टीका करण्यात येत होती. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यांनतर उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे बरोबर राजकीय आघाडी केली. यामुळे आंबेडकरांची ही कृती मान्य आहे काय? याचे उत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावं, असं आव्हानच भाजपने उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
औरंगजेबाच्या मुद्द्यावरून भाजपने आंबेडकर आणि ठाकरे यांना घेरलेलं असतानाच मुंबईत लागलेल्या एका बॅनर्सने खळबळ उडाली आहे. हे बॅनर्स कुणी लावले? असा प्रश्न या निमित्ताने केला जात आहे.
माहीम परिसरामध्ये काल मध्यरात्री रात्री अज्ञात व्यक्तीने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत वरील एका बॅनरवर औरंगजेबाचा फोटो लावण्यात आला होता. सकाळी बॅनर वर फोटो दिसल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक शिवसैनिकांकडून हे बॅनर तत्काळ हटवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांना या संबंधित माहिती देण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांकडून अज्ञात व्यक्ती विरोधात तपास सुरू केला आहे.
हे बॅनर कोणी लावला या संदर्भात अद्यापही कुठलीही माहिती समोर आली नाही आहे. अशा प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. मात्र या बॅनरमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.
माहीम परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्सवरील भाषा अत्यंत आक्षेपार्ह आहे. औरंगजेबाच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे, असं या बॅनर्सवर मजकूर लिहिलं आहे. तसेच या बॅनर्सवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो लावण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.