

Chhagan Bhujbal Claims NCP State President Position : मुंबईत बुधवारी (ता. २१) राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या एका मागणीने हा सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे. यावेळी त्यांनी 'मला विरोधी पक्षनेते पद नको होते. आता पक्षात कुठलेही पद द्या, त्याला न्याय मिळवून देईन' असे स्पष्टपणे सांगितले. स्वतः शरद पवार यांच्यापुढे अजितदादांनी घेतलेल्या या स्पष्ट भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)
यावेळी अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यकाळ पाच वर्षे एक महिना झाल्याचेही सांगितले. त्यामुळे अजित पवार यांचा प्रदेशाध्यक्ष पदावर डोळा असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमिवर पक्षातील इतर नेत्यांनीही आता प्रदेशाध्यक्ष पदावर दावा सांगण्यास सुरूवात केली आहे. यात माजी मंत्री छगन भुजबळ आघाडीवर आहेत. पक्षात संघटनेच्या निवडणूक सुरू असताना छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. तसेच हे पद दुसऱ्या समाजाला देण्याची आग्रहही त्यांनी केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, "राष्ट्रवादी पक्षात पक्ष नेते पदावर एकसमाज व्यक्ती असेल तर प्रदेशाध्यक्ष पदावर दुसऱ्या समाजाची व्यक्ती असावी. विरोधी पक्षनेते अजित पवार असल्याने प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी समाजाचे नेत्याला संधी द्यावी. ओबीसींबद्दल फक्त बोलून चालणार नाही. त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली पाहिजे. पक्षात सुनील तटकरे, जिंतेद्र आव्हाड, धनंजय मुंडे आहेत. मला जरी ही जबाबदारी दिली तरी काम करेन."
भुजबळ यांनी अंतिम निर्णय शरद पवारच घेतील हेही यावेळी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, "ही आमची फक्त सूचना आहे. पक्षातील कुणाला कुठले पद द्यायचे याचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेतील." दरम्यान, खासदरा सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची इच्छे पूर्ण व्हावी हीच माझी इच्छा असल्याचे वक्तव्य केले. याता छगन भुजबळ यांच्या विधानांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.