Mumbai News : मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश कोपरकर यांच्या पत्नी व भांडुपकमधील प्रभाग ११० च्या नगरसेविका आशा कोपरकर यांच्याविरोधात भांडुप पोलिसांनी शुक्रवारी खंडणी, अपहरण, मारहाण आदी गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यात कोपरकर यांचा मुलगा सर्वेश, मुली अक्षता व मनस्वी, जावई कुणाल भोईर यांनाही आरोपी केले आहे.
भांडुपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय फॅशन डिझायनर महिलेने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई केल्याचे भांडुप पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत तक्रारदार महिलेने कोपरकर चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ व मारहाण केलीच मात्र अपहरण करत जीवे ठार मारण्याची धमकी देत मुंबईसह, कर्जत येथील मालमत्ता आणि कार हडपण्याचा प्रयत्न केल्याचा, गंभीर आरोप लावला आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार २०२० मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांच्यासोबत ओळख झाली.त्यांच्याच सांगण्यावरून तक्रारदार निवडणूक प्रचारात सहभागी झाल्या. पुढे ओळख वाढली आणि घरी येणे जाणे वाढले. कोपरकर आवश्यकतेनुसार या महिलेस आर्थिक मदत करत असत. त्यावरून कोपरकर कुटुंबीयांनी गैरसमज निर्माण करून घेत २०२२ मध्ये शिवीगाळ, दमदाटी केली होती. मात्र त्यानंतरही दोघांमधील संवाद सुरूच राहिला.
१५ मे रोजी तक्रारदार महिला कामानिमित्त बाहेर असताना कोपरकर कुटुंबीय आणि अन्य आरोपी त्यांच्या घरी धडकले. घरी उपस्थित असलेल्या मुलांसमोर शिवीगाळ करू लागले. आणि त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. काही वेळात घरी पोचलेल्या तक्रारदार महिलेस कोपरकर कुटुंबीयांनी हाताला धरत इमारतीखाली नेले, गाडीत कोंबून कार्यालयात आणले.
तेथे महिलेवर आरोप करून मारहाण केली गेली. पुढे या महिलेच्या कर्जत येथील फार्महाऊसची तोडफोड केली गेली. तिची इनोव्हा गाडी कार्यालयात जमा करून घेतली. भांडुपचे राहते घर, कर्जतचे फर्म हाऊस आणि कार बऱ्या बोलणे सांगू त्या व्यक्तीच्या नावे करावी लागेल अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी देण्यात आली. त्यासाठी वारंवार दबाव टाकण्यात आला, असा आरोप महिलेने तक्रारीत केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.