

Bjp News : लोकसभेत शुक्रवारी महिला आरक्षणाला विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध करण्यात आला. त्यामुळे मतदानाच्या वेळी महिला आरक्षणा विधेयक पडले. त्यानंतर काही वेळातच संतप्त झालेल्या भाजपच्या महिला खासदारांनी संसदेच्या आवारातच जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संसदेच्या परिसरात घोषणाबाजी करीत विरोधकांवर टीका केली.
हा प्रकार ताजा असतानाच शनिवारी भाजपच्या महिला नेत्यांनी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी भाजपच्या महिला नेत्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी खासदार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार बन्सुरी स्वराज यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले आहे.
संसदेत महिला आरक्षणाला विरोधी पक्षाने जोरदार विरोध केला. त्यामुळे शुक्रवारी संसदेत महिला आरक्षणा विधेयक पडले. त्यानंतर भाजपच्या (BJP) महिला नेत्यांनी देशभरात आंदोलन सुरु केले आहे. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शुक्रवारी दुपारी दिल्लीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर 'हाय व्होल्टेज' ड्रामा पाहण्यास मिळाला. याठिकाणी भाजपच्या महिला नेत्यांनी आंदोलन केले.
याठिकाणी आंदोलन करणे भाजपच्या महिला नेत्यांना चांगेलच भोवले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी खासदार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खासदार बन्सुरी स्वराज यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीत भाजपच्या महिला नेत्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महिला नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली.
दरम्यान, या भाजप महिला नेत्याच्या आंदोलनावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. दिल्लीत सध्या प्रचंड तणाव असून राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर आणि संसद परिसराबाहेर निमलष्करी दलासह पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.