Sanjay Raut - Rahul Shewale Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray & MP Sanjay Raut : ठाकरे, राऊतांना कोर्टाने ठोठावला दंड ! काय आहे कारण..

MP Rahul Shewale defamation case : ठाकरे तसेच राऊत यांनी नियमानुसार दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला तातडीने आव्हान द्यायला हवे होते, मात्र त्यांनी ते केले नाही. नियमांनुसार विहित केलेल्या बाह्य मुदतीपासून 84 दिवसांचा विलंब झाला.

Chaitanya Machale

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना कोर्टाने दंड ठोठावला आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांची बदनामी केल्याप्रकरणी हा दंड करण्यात आला असून पुढील दहा दिवसांत दंडाची रक्कम शेवाळे यांना देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्याबाबत बदनामी करणारे लेखन प्रसिद्ध करण्यात आले होते. आपल्या विरोधात लेख प्रसिद्ध केल्याबद्दल राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांच्या विरोधात बदनामीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीसंदर्भात माझगाव दंडाधिकारी न्यायालयात कार्यवाही सुरू आहे.

या प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठाकरे आणि राऊत यांना समन्स बजाविले होते. हे बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ठाकरे तसेच राऊत यांनी नियमानुसार दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला तातडीने आव्हान द्यायला हवे होते, मात्र त्यांनी ते केले नाही. नियमांनुसार विहित केलेल्या बाह्य मुदतीपासून 84 दिवसांचा विलंब झाला.

हा उशीर झाल्याने या दोन्ही नेत्यांनी विलंब माफ करण्यासाठी आपले वकील मनोज पिंगळे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज करण्यासाठी झालेला विलंब माफ करण्याची मागणी दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयाकडे (Court) केली. यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी ठाकरे आणि राऊत यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला. मात्र, त्याचवेळी, त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड सुनावला. या दोन्ही नेत्यांनी जाणूनबुजून विलंब केलेला नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांचा विलंब माफीचा अर्ज मान्य केला जात असल्याचे न्यायालयाने नमूद केले.कोर्टाने केलेल्या दंडाची रक्कम पुढील दहा दिवसात राहुल शेवाळे यांना देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT