sarkarnama
मुंबई

'मातोश्री'ला वाचविण्यासाठी जाधवांनी स्वतःच्या आईचे नाव द्यावे?..वाईट वाटतं!

यशवंत जाधव यांनी हे घड्याळ त्यांच्या आईच्या वाढदिवसाला भेट दिल्याचे सांगितले.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yasahwant Jadhav),त्यांचे सहकारी आणि बीएमसी (BMC)कंत्राटदार यांच्या निवासस्थानी आयकर विभागाला (Incom tax department)काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. (kirit somaiya news update)

तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली आहे. या डायरीत काही महत्त्वाचे व्यवहाराचे पुरावे सापडल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

'हद्द कर दी. यशवंत जाधव यांनी घोटाळा लपविण्यासाठी, वांद्रा मातोश्रीला वाचविण्यासाठी स्वतःच्या “आई”चे नाव द्यावे…वाईट वाटते. तसेच ५० लाखाचे घड्याळ, २ कोटी रोख जाधवांनी पोच पावती, बिल ही घेतले असेल?’असा खोचक सवालही सोमय्यांनी टिवट् करुन केला आहे.

जाधव यांच्या डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला 50 लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला 2 कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराचे नावही मातोश्री आहे. डायरीत मातोश्रीच्या उल्लेखावरून चौकशी केली असता यशवंत जाधव यांनी हे घड्याळ त्यांच्या आईच्या वाढदिवसाला भेट दिल्याचे सांगितले.

दुसरीकडे, गुढीपाडव्याला त्यांनी आईच्या स्मरणार्थ गरजूंना भेटवस्तू दिल्याचा खुलासा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नावही 'मातोश्री' आहे. त्यामुळेच आता या प्रकरणातील गांभीर्य वाढलं आहे. जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली होती. याच डायरीतील एक उल्लेख असा आहे की, ज्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

जाधव आणि कुटुंबीयांनी भायखळा येथील इमारत खरेदीसाठी सुमारे १५ कोटी रुपये कंपनीने दिले होते. जाधव कुटुंबीयांनी नंतर हे पैसे कंपनीला परत केले, जे नंतर कंपनीने न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित केले.

बीएमसीच्या ३० कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी बिमल अग्रवाल यांची मर्जी यशवंत जाधव यांनी राखल्याचा संशय आहे. जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळ्याच्या आमदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. कोलकाता येथील प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीकडून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला या शपथपत्रातून मिळाली होती. (kirit somaiya news update)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT