मोहोळांच्या घरी किती दाबाने पाणी येते हे बापटांनी पाहावे ; काकडेंचा टोला

''महानगरपालिका निवडणुकीत पुणेकर जनता तुम्हाला घरी पाठवेल यात शंका नाही,''

Ankush Kakade, Murlidhar Mohol, Girish Bapat, Ankush Kakade on Girish Bapat News Updates, Ankush Kakade criticise Girirsh Bapat
Ankush Kakade, Murlidhar Mohol, Girish Bapat, Ankush Kakade on Girish Bapat News Updates, Ankush Kakade criticise Girirsh Bapatsarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुण्यातील पाणी प्रश्नावरुन राजकारण तापलं आहे. खासदार गिरीश बापट (Girish Bapat)हे कालवा समितीच्या बैठकीतून तावातावात बाहेर पडले होते. 'आयुक्तांच्या ( Pune Municipal Commissioner)घरी पाण्याचे प्रेशर चांगलं, पण त्यांना इतर प्रेशरच जास्त' असा टोला गिरीश बापट यांची लगावला होता. (Ankush Kakade on Girish Bapat News)

यावरुन आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakade)यांनी गिरीश बापटांवर निशाणा साधला आहे. "गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली " असा प्रश्न अंकुश काकडे यांनी उपस्थित केला आहे.

''पुणे महानगरपालिकेत गेली पाच वर्षे भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद बहुमत होतं, त्यांची सत्ता होती तेव्हापासून पुण्याच्या पाणीपुरवठ्यात खंड पडत आहे, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने मिळत आहे ही वस्तुस्थिती आपली भाजपची कारकीर्द संपल्यानंतर गिरीश बापट यांच्या लक्षात आली हे आश्चर्य आहे," असा टोला काकडेंना बापटांना लगावला आहे.


Ankush Kakade, Murlidhar Mohol, Girish Bapat, Ankush Kakade on Girish Bapat News Updates, Ankush Kakade criticise Girirsh Bapat
राणेंच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरे सरकारचे तीन मंत्री काय बोलणार?

''बापटांनी आयुक्तांच्या घराची पाहणी केली, माझी त्यांना विनंती आहे की माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते देखील त्यांनी पाहावे आणि जनतेला सांगावे. गेल्या पाच वर्षातील आपल्या अपयशी कारकिर्दीची ठपका आता महापालिका आयुक्त वर ठेवून काही उपयोग नाही. येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणुकीत पुणेकर जनता गेल्या पाच वर्षातील भाजपचा महापालिका कारभार पाहून तुम्हाला घरी पाठवेल यात शंका नाही,'' असे अंकुश काकडे म्हणाले.


Ankush Kakade, Murlidhar Mohol, Girish Bapat, Ankush Kakade on Girish Bapat News Updates, Ankush Kakade criticise Girirsh Bapat
भाजपकडून मायावतींना राष्ट्रपती पदाची ऑफर? बसपाची कार्यकारणी बरखास्त

बापट यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारच्या दबावाखाली आयुक्त काम करत असल्याचा आरोप केला आहे. पुणे शहरात कसबा, नाना पेठेसह अन्य भागांमध्ये कमी-जास्त दाबाने पाणीपुरवठा होत आहे. येत्या तीन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा (Water Supply) सुधारला नाही, तर नागरिक रस्त्यावर येतील, असा इशाराही गिरीश बापट यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देऊन सभात्याग केला होता. त्यानंतर काल गिरीश बापट यांनी पुण्याच्या पाणीप्रश्नावर आक्रमक होत थेट आयुक्तांचे घर गाठले.

आपलं आंदोलन हे आयुक्तांच्या विरोधात नसल्याचं बापटांनी स्पष्ट केलं. अर्धा तासात आयुक्तांचा पाहुणचार घेऊन बापट बाहेर आले. त्यामुळे ‘पाण्याचं प्रेशर तपासायला आले आणि चहा-पाणी करुन गेले’अशी चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com