Mumbai News: राज्य सरकारने धारावीचा पुनर्विकास करण्याचे कंत्राट अदानींच्या कंपनीला दिले आहे. यात टीडीआरचा मोठा घोटाळा आहे. शिवाय धारावीसह मुंबईतील तीन मोठे प्रकल्पही अदानींच्या घशात घालण्याचा डाव आहे, असे आरोप करून ठाकरे गटाने अदानींच्या कार्यालयावर शनिवारी भव्य मोर्चा काढला. या मोर्चावरून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तत्कालीन महाविकाल आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. वांद्रे येथील MIG क्लबमध्ये या बैठक सुरू आहे. बैठकीपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. बैठकीत लोकसभेच्या २२ जागांचा आढावा घेतला जाणार आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत.
सेटलमेट करण्यासाठी ठाकरे गटाने गौतम अदानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे. महाविकास आघाडीला आता जाग आली आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. अदानी समूहाकडून पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. "पारदर्शक, खुल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बोली लावल्यानंतर धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला मिळाले. या निविदेतील अटी या महाविकास आघाडी सरकारच्या काळात निश्चत झाल्या होत्या, असे अदानी समूहाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत काही जणांकडून चुकीची माहिती पसरवण्याचा एकत्रित प्रयत्न सुरू आहे, असे अदानी समूहाने म्हटले आहे. ठाकरे गटाच्या मोर्चानंतर अदानी समूहाकडून हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुंबईत धारावी टी जंक्शन ते अदानी समूहाच्या वांद्रे कुर्ला संकुलातील कार्यालयापर्यंत शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चानंतर जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांनी अदानींसह राज्यातील सत्ताधारी भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. हा जगातला सर्वात मोठा टीडीआर घोटाळा आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.