Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

तुमच्याच घराशेजारी डान्सबार सुरू आहे : अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Ajit Pawar : अजित पवार यांनी भाषणात राज्य सरकारला धारेवर धरत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

सरकारनामा ब्युरो़

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar Latest News) यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर आज आक्रमक भाषण करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ठाण्यातील डान्स बार बंद करणारा मी कार्यकर्ता आहे, असे म्हणणाऱ्या शिंदे यांच्या ठाण्यातील घराजवळचा आता डान्स बार सुरू असल्याचा घणाघाती आरोप अजित पवार यांनी केला. तसेच राज्यात गेल्या काही दिवसांत कायदा व सुव्यवस्थाबाबत झालेल्या घटनांवर त्यांनी भाष्य केले.

भंडारा जिल्ह्यात घडलेल्या बलात्कार प्रकरणावर पवार म्हणाले, भंडारा बलात्कार घटना दुर्दैवी आहे. पोलिसांनी वेळीच पिडीतेला रूग्णालयात दाखल केले असतं तऱ ही वेळ आलीच नसती. भंडारा पोलिस अधीक्षक पद रिक्त ठेवणे हे बरोबर नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांनी एकमेकाला धक्काबुक्की केली. या घटनेनंतर अजित पवार यांनी विधीमंडळात बोलताना शिंदे गटावर टीका केली. आम्ही सत्तेवर असतानाही विरोधीपक्ष विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. मात्र, आम्ही त्यांना कधी अडवलेले नाही. परंतु आज जाणीवपूर्वक हा प्रकार घडला. महाराष्ट्रात ज्याप्रकारे आमच्या घोषणा दाखवल्या गेल्या, त्याने आपली प्रतिमा मलिन झाल्याची शंका त्यांना आली असावी, चारोच्या मनात चांदणं असा हा प्रकार असल्याचे अजित पवार म्हणाले.

मंत्रिमंडळात एकही महिला मंत्रीचा समावेश नसल्याच्या मुद्दयावरूनही पवारांनी सरकारला सुनावले. आमच्या सरकारमध्ये काही महिला मंत्र्यांना स्थान दिले गेले होते. पण सध्याच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पुढील मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना संधी द्यावी, अशी मागणीही पवारांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस तेव्हा म्हणाले मी पुन्हा येईन नंतर उद्धव ठाकरे आले. सत्तेचा ताम्रपट कुणीही घेऊन आलेले नाही. सत्ता आल्यानंतर आनंद होणे स्वाभाविक आहे त्यात दुमत नाही, सत्तारूढ आमदार जाहीरपणे चिथावणी देतात. कशाची मस्ती आली एवढी? 288 आमदारांमध्ये 40 आमदाराचे झालेले लाड परवडणारे नाहीत. अधिकाऱ्यांची झटक्यात बदली होतात. तुमच्यातले काही आमदार, कालच क्लेकटरची बदली झाली. तू किस झाड की पत्ती है, असे सांगतात. हे भाजपला कसे चालतं? दुसऱ्या एका आमदाराने अधिकाऱ्यांच्या कानाखाली मारली. कायदा समान आहे. समाजात चुकीचा मेसेज जातो, असेही अजित पवार म्हणाले.

एकीकडे 16 डान्स बार फोडणारा हा एकनाथ शिंदे आहे, असे आपण सांगितले. मात्र ठाण्यात तुमच्याच घराशेजारी डान्स बार सुरू आहेत. डान्सबार आपण बंद करावेत. ऑनलाईन मटका ही सध्या जोरात सुरू आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.

आम्ही महाविकास आघाडीचे आमदार रोज साडेदहा वाजता विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत असतो, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर मागण्या असलतील. त्या विविध घोषणांद्वारे सरकारसमोर मांडत असतो. मात्र, त्यातील पन्नास खोके एकदम ओक्के ही घोषणा त्यांना चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यातून हा प्रकार घडला असल्याचे अजित पवारांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT