Dasara Melava Sushama Andhare Speech Sarkarnama
मुंबई

Sushama Andhare Speech : मोठा गौप्यस्फोट, सुषमा अंधारे यांच्यासोबत 'मांडवलीचा' प्रयत्न करतंय कोण?

Chetan Zadpe

Sushama Andhare Dasara Melava 2023 Speech : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल (दि.२५ ऑक्टोबर) ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात जोरदार भाषण केले. या वेळी त्यांनी भाजप - शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत एक मोठा गौप्यस्फोट केला.

'काही नेते आपल्यावर एकीकडे अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा कॅमेऱ्यासमोर करत आहेत, पण मुळात पडद्यामागे ते आपल्यासोबत मांडवली करण्याचा प्रयत्न करत आहेत,' असा मोठा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी या वेळी केला. (Latest Marathi News)

अंधारे म्हणाल्या, “आम्ही साधी भूमिका मांडली की, नाशिकला एवढा शेकडो कोटींचा ड्रग्ज सापडतो, तर नाशिकचा पालकमंत्री काय गोट्या खेळत होता का? आम्ही भूमिका मांडतोय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री आणि अधिकारी काय करतात? अशी भूमिका आम्ही मांडतो.

पुण्यातील एसपींचं काय चाललेलं असतं? हे सगळे प्रश्न विचारले की, मंत्री धमकावतात, घाबरवतात आणि म्हणतात काय, आम्ही तुमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करू. आम्ही नोटीस पाठवू. आम्ही हे करू, ते करू”, असं अंधारे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीसांना केले लक्ष्य

मला घाबरवण्यासाठी फडणवीस लोकांना पाठवताहेत. देवेंद्र फडणवीसांनी कुणाला घडवलं नाही, तर फक्त जगवलं आहे. गृहमंत्री म्हणून 9 महिने ड्रग तस्कर ललितला कुठल्या आजारपणासाठी ठेवला होता, असा आरोप करत फडणवीसांवर टीकेची झोड उठवली.

"भाजप एवढा मोठा पक्ष असताना आमच्या पक्षातील माल कशाला उचलतात. फडणवीसजी, तुम्ही अनेकांना नडला असाल, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेशी गाठ पडली नसेल," असा इशाराही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.

(Edited By Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT