Mumbai News : शिवसेनेतील बंडखोरीनंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी सभा घेत बंडखोर शिंदे गटासह भाजपलाही धारेवर धरले होते.
याचवेळी आता दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थवर जोरदार तयारी केली आहे. या मेळाव्यात आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटासह गृहमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.
ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थवर मंगळवारी पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी भाजपसह शिंदे गटावर टीकेचे बाण सोडले. अंधारे म्हणाल्या, मी सातत्याने काही दिवसांपासून तरुणाईच्या हिताची भूमिका मांडतेय. मागील दीड महिन्यांपासून भूमिका माडतेय महाराष्ट्र नशामुक्त झाला पाहिजे. राज्य उडता पंजाब होऊ नये. नाशिकमध्ये शेकडो कोटींचा ड्रग्जचा साठा सापडतोय, मग नाशिकचे पालकमंत्री गोट्या खेळत होते का ? असा सवाल करत मंत्री दादा भुसेंवर निशाणा साधला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अंधारे म्हणाल्या, मला घाबरवण्यासाठी फडणवीस लोकांना पाठवताहेत. देवेंद्र फडणवीसांनी कुणाला घडवलं नाही, तर फक्त जगवलं आहे. नोटिसा पाठवणारे आतून माझ्याशी सेटिंग करायला बघताहेत. गृहमंत्री म्हणून 9 महिने ललितला कुठल्या आजारपणासाठी ठेवला होता असा आरोप करत फडणवीसांवर टीकेची झोड उठवली.(Dasara Melava)
देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) कोणाला घडवलं नाही फक्त जमवलं.. त्यांनी अनेक नेते संपवलेत, आता चंद्रकांत पाटील यांच्या मागे लागले आहेत. फडणवीसांच्या पाठीशी एवढी मोठी महाशक्ती आहे, तर शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्याचं काम करत आहे. मागच्या वर्षी दसरा मेळाव्यात एक खुर्ची रिकामी होती. पण यावर्षी ती राहणार नाही असेही त्या म्हणाल्या.
अंधारे म्हणाल्या, भाजप एवढा मोठा पक्ष असताना आमच्या पक्षातील माल कशाला उचलतात. फडणवीसजी, तुम्ही अनेकांना नडला असाल, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेशी गाठ पडली नसेल, असा इशाराही ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.