Sharad Pawar News Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : शरद पवारांनी डाव टाकला? आमदार मानसिंग नाईक बैठकीस उपस्थित...

NCP News : एका आमदाराला आपल्याकडे वळविण्यास शरद पवार यशस्वी झाल्याची चर्चा आहे.

Mangesh Mahale

Mumbai News : अजित पवार गटाकडे किती आमदार आहेत, हा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही, अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला आमदार मानसिंग नाईक हेही उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांना आपल्याकडे वळविण्यात शरद पवार यशस्वी झाल्याची चर्चा आहे. नाईक कुठल्या गटाकडे आहेत, याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली नव्हती.

शिरूर, कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, सातारा व माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक सुरू आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीला त्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, अध्यक्ष फ्रंटचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

स्वतः शरद पवार मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. हिंगोली, वर्धा, दिंडोरी, नगर, अमरावती, बीड, भिवंडी व जालना लोकसभा मतदारसंघांचा आढावा उद्या (गुरुवार) घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काही आमदारांनी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे ते कुठल्या गटात आहेत, हे स्पष्ट झालेले नाही, त्यात मानसिंह नाईक हेही आहेत.

नाईक हे शिराळा विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. ते अजित पवार गटात जातील, अशी चर्चा होती, आजच्या बैठकीला नाईक यांनी उपस्थिती लावल्याने ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचे समजते.

याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. शरद पवारांच्या बैठकीतून बाहेर पडल्यावर आमदार मानसिंग  नाईकांनी माध्यमांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी मानसिंग नाईक पत्रकारांवर चिडल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT