Lalit Patil Drugs Case : 'ससून'मधून मी पळालो नाही, मला पळवलं गेले ! ललित पाटीलचा मोठा गौप्यस्फोट

Lalit Patil Arrested : ललितला कोणी पळवलं, यामागे कोण राजकीय नेता आहे..
Lalit Patil
Lalit PatilSarkarnama

Mumbai News : मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला ड्रगमाफिया ललित पाटील याने मोठा खुलासा केला आहे. तो पळून गेल्याची माहिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती, पण 'मी ससूनमधून पळून गेलो नाही, तर मला पळवलं गेले," असा मोठा गौप्यस्फोट ललितने केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चैन्नई येथे त्याला अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला घेऊन जात असताना त्याने ही माहिती दिली. ललितने केलेल्या दाव्यामुळे ललितला कोणी पळवलं, यामागे कोण राजकीय नेता आहे, असे अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.

मला पळून जाण्यास कुणाचा हात आहे, हे मी सांगेन, असे ललितने सांगितले. नाशिक पोलिस, पुणे पोलिस तसेच मुंबई पोलिस हे ललित पाटीलच्या मागावर होते. असे असताना ललित पाटील कित्येक दिवस नाशिकमध्येच होता, मग पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागला नाही? त्याला कुणाचे राजकीय पाठबळ होते का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Lalit Patil
lalit patil News : ललितच्या अटकेनंतर आईवडिलांना अश्रू अनावर; म्हणाले, 'पोलिसांनी आम्हाला त्रास देऊ नये, कारवाई योग्यच!

पोलिस आणि तपास यंत्रणांच्या शोध कार्याला गती येताच ललित पाटीलने नाशिकमधून धूम ठोकली. त्यानंतर तो इंदोरला गेला, मग सुरतमध्ये आणि पुन्हा नाशिक, धुळे आणि औरंगाबाद करत तो कर्नाटकमध्ये बंगळुरूत गेला.

बंगळुरूवरून चेन्नईला जात असताना साकीनाका पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली. चकवा देणारा ललित पाटील हा अखेर सापडला, पण महाराष्ट्रातून पळून जाण्यात त्याला कुणी मदत केली का? त्याला राजकीय पाठबळ मिळाले का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

ललितच्या अटकेनंतर मुंबई पोलिस आयुक्त आज दुपारी माहिती देणार आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. त्याल साकीनाका पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. गेल्या सोळा दिवसापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते.

यापूर्वी ललितचा भाऊ भूषण आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलकवडे या दोघांना पोलिसांनी नेपाळजवळ अटक केली आहे. ललितच्या अटकेनंतर त्याच्या आई-वडीलांनी उतारवयात पोलिसांनी आम्हाला त्रास देऊ नये, पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे," असे सांगितले. हे सांगतांना त्यांना अश्रू अनावर झाले. ललित पाटील दोन ऑक्टोबरला रात्री ससूनमधून पळून गेला होता.

Lalit Patil
Lalit Patil Arrested : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com