Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Mantralaya Meeting: अजित पवारांनी अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलावलं..; बैठकांचा सपाटा सुरु..

Mantralaya Meeting News: अनेक अधिकाऱ्यांनी धावपळ करीत मंत्रालय गाठलं.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) मंत्रालयातून कामकाजाला सुरुवात केली आहे. ते सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मंत्रालयात पोहचले. त्यांनी अधिकाऱ्यांसोबत तातडीनं बैठक बोलावली आहे.

अजित पवारांनी बैठकांच्या सपाटा सुरु केला आहे. अजितदादांनी सकाळीच नऊ वाजताच अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलावले, त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी धावपळ करीत मंत्रालय गाठलं. अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर आज खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. सत्तेत सहभागी होताना अजित पवार यांच्यासाठी अर्थखात सोडण्याचा शब्द भाजपकडून देण्यात आला होता. त्यानुसार अर्थखाते राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांना अर्थखात्यासोबतच, दिलीप वळसे पाटील यांना सहकार खातंही मिळाल्याची माहिती मिळत आहे.

सहकार, महिला व बाल कल्याण, सामाजिक न्याय ही खाती देखील राष्ट्रवादीच्या पदरात पडणार आहे. अजित पवार यांना अर्थखातं देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आक्रमकपणामुळे तूर्तास शिंदे गटाकडील कोणतेही खाते नव्या मंत्र्यांना दिले जाणार नाही, असे समजते.

खातेवाटपाची संभाव्य यादी

  • अर्थ - अजित पवार

  • कृषी - धनंजय मुंडे

  • सहकार- दिलीप वळसे पाटील

  • वैद्यकीय शिक्षण - हसन मुश्रीफ

  • अन्न नागरी पुरवठा - छगन भुजबळ

  • अन्न आणि औषध प्रशासन - धर्मराव अत्राम

  • क्रीडा- अनिल भाईदास पाटील

  • महिला आणि बालकल्याण - अदिती तटकरे

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT