Mumbai News : शिवसेना नेता तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत पुरस्काराने गौरवण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हा गौरव झाला. शरद पवार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचे झालेल्या कौतुकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केल्याने राज्याच्या राजकारण त्याचे पडसाद उमटले असून, राऊत विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले आहेत. राऊत यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, मंत्री तुटून पडले आहे. आमदार संतोष बांगर यांनी तर थोबाडातील मारण्याची भाषा करत खळबळ उडवून दिली.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार संतोष बांगर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी चांगल्या माणसाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. मात्र तुमच्या थोबाडीत मारली पाहिजे.राऊत कायम गद्दारी-गद्दारी करत आहेत, असे किती दिवस राहणार, असे म्हटले.
'गद्दारी-गद्दारी करणाऱ्यांना लोकांनीच कोण गद्दार आणि कोण नाही, हे दाखवून दिले आहे. गद्दार असतो, तर आमचे साठ आमदार निवडून आले नसते. खरी गद्दारी तुम्हीच केली आहे', असा घणाघात शिवसेनेचे (Shivsena) आमदार बांगर यांनी राऊतांविरोधात केला.
'शरद पवार यांना देखील कळाले असेल, की खरी गद्दारी कोणी केली हे समजले असेल. त्यांनी चांगल्या माणसाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तुमच्या तर थोबाडीत मारायला हवी. बाळासाहेब ठाकरे एकमेव असे नेते आहेत की, त्यांनी महाराष्ट्रासह देश गाजवला. त्यांतर दुसरे संयमी आणि धुरंधर राजकारणी म्हणून शरद पवार आहेत', असेही संतोष बांगर यांनी म्हटले.
शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सरहद संस्थेकडून महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शरद पवार यांच्या हस्ते हा सन्मान झाला असून, ते संमेलनाच स्वागताध्यक्ष आहेत.
शरद पवार यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांची झालेली ही जवळीकवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे संजय राऊत यांनी जळजळीत टीका केली. यातून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना, भाजप आणि विरोधकांनी संजय राऊत यांना आज दिवसभर लक्ष केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.