
Nagpur News : महापालिकेची निवडणूक कोण कशी लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती होणार की नाही, याविषयी मतभेद आहेत. बड्या नेत्यांचे वक्तव्य बघता सर्वच पक्षांना स्वबळावर लाढावे लागणार असल्याचे दिसून येते.
आघाडी आणि युती झाली, तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय भवितव्य नागपूर महापालिकेची निवडणुकीवर अवलंबून राहणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सुमारे पंधरा वर्षे राज्यात सत्ता होती. महायुतीच्या (Mahayuti) सरकारमध्येही सुमारे अडीच वर्षे राष्ट्रवादी सहभागी होती. असे असले तरी भाजप आणि काँग्रस या दोन मोठ्या पक्षांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नागपूर शहरात आजवर फारकाही करता आले नाही. राजकीय ग्राफ उंचावण्याऐवजी खालीच अधिक गेला. आता अजित पवार आणि शरद पवार अशा दोन गटात कार्यकर्ते विभाजित झाले आहेत.
महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) गटासाठी भाजप महापालिकेच्या निवडणुकीत जागा सोडण्याची शक्यता दिसत नाही. 150 पैकी 108 नगरसेवक यापूर्वीच्या निवडणुकीत भाजपचे निवडून आले होते. उरलेल्या 42 जागेवर भाजपचे सुमारे तीनशे कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. भाजपला आपल्या कार्यकर्त्यांना महापालिकेचे तिकीट देताना जागा कमी पडणार आहे. त्यातही राष्ट्रवादी व शिवसेना वाटा देण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत युती करण्याचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना दिले आहे. नागपूरचा विचार करता भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा महापालिकेच्या निवडणुकीत युती करण्यास विरोध आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरात अस्तित्व नाही, त्यांची काहीच ताकद नसल्याने एकही मतदारसंघ सोडण्यास काँग्रेसने नकार दिला होता. यानंतरही पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांनी खेचून आणला. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे पराभूत झाले आहे.
काँग्रेसला उमेदवार असता तरी निवडणुकीचा निकाल बदलला नसता हे कृष्णा खोपडे यांनी घेतलेल्या सुमारे एक लाखांच्या मताधिक्यातून दिसून येते. विधानसभेत नागपूरमधून काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे दोन दिग्गज नेते असतानाही काँग्रेसला मिळालेले यश मोठे मोनले जाते. काँग्रेसची ताकद अजूनही कायम आहे हेच यातून दिसून येते. त्यामुळे काँग्रेसला महापालिकेच्या निवडणुकीत पुनरागमन करण्याची संधी आहे.
उद्धव ठाकरे सेनेला सोबत घेण्याच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. तुलनेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत थोसॉफ्ट कॉर्नर आहे. असे असले तरी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडी करण्यास इच्छुक नाही. वर ठरले तर काँग्रेसचा नाईलाज होणार मात्र जागा सोडताना मात्र मोठे मतभेद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही असित्त्व ही निवडणूक ठरवणार आहे.
अजित पवार यांच्यासोबत पांढरे कपडे घालून मिरवणारे कार्यकर्ते गेले. त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रसला फारकाही फरक पडला नाही. 2017च्या निवडणुकीत 135कार्यकर्ते लढले होते. त्यापैकी एकहीजण सोडून गेला नाही. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी होईल, अशी आशा आहे. नाही झाली तरी आम्ही लढणार असल्याचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.