Deepak Kesarkar sarkarnama
मुंबई

केसरकर म्हणतात...मी उद्धव ठाकरेंवर टीका केली नाही, करणार नाही

Deepak Kesarkar : शिंदे गटाचे सगळे मंत्री बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या समाधी स्थळावर गेले होते.

सरकारनामा ब्यूरो

Deepak Kesarkar : मुंबई : शिंदे सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. त्यानंतर शिंदे गटाचे सगळे मंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळावर गेले होते. अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते व कॅबीनेट मंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिला.

यावेळी बोलताना केसरकर म्हणाले, मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली अशी बातमी आली. मात्र, मी कधीच त्यांच्यावर टीका केली नाही. करणार नाही, हे आधीच म्हटले आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला तेव्हा सगळेच त्यात सहभागी झाले होते. प्रबोधनकार ठाकरे होते. बाळासाहेब यांच्याबद्दल बोलताना माझा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण केला असे ते म्हणाले होते, असेही केसरकर यांनी सांगितले.

मी तेवढेच बोललो, उद्धव साहेबांवर ती टीका नव्हती, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब हे शिवसेना प्रमुख तर होतेच मात्र, त्या पलीकडेही ते होते, बाळासाहेबांवर प्रेमाचा हक्क सगळ्यांचा आहे. कोणताही गैर समज झाला असेल तर ते मी दूर करतो, असेही केसरकर यांनी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर संभाजी महाराजांना अटक झाली, नंतर दोन गाद्या तयार झाल्या. नंतर गवताचे भाले झाले असे आपण म्हणतो. जयपूर पेक्षा कोल्हापूरचा पॅलेस सुंदर होता. महाराजांचा इतिहास, त्यांच्या वस्तू हे सगळे लोकांना पाहता यावे, जसे परदेशात राणीला भेटायला लोक जातात तसे आपल्याकडे लोक आपल्या राजांना भेटायला यायला हवेत, असेही केसरकर यांनी सांगितले.

मी स्वतः दौऱ्यावर जाताना पुणे, सातारा, कोल्हापूर असा दौरा करून महाराजांचा आशीर्वाद घेणार आहे. नंतर मुंबईत येऊन अधिवेशनात थांबणार आहे. माझी स्वतःची कौटुंबिक पार्श्वभूम आहे, प्रत्येक पक्षाची पार्श्वभूमी मी अनुभवली असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. रेशीम बाग येथे जाणे कमी पणा नाही. मतभेद कशात नाही, असेही त्यांनी सांगितले.

मंत्र्यांना ऑफिसेस दिली जातात ती दिली गेली आहेत. मी मुद्द्यांवर बोलतो, व्यक्तीवर नाही, असा टोलाही त्यांनी लगावाल. मी त्यांना लहानाचा मोठे होताना पाहिले नाही. पण काही काळ त्यांच्या सोबत मी होती. त्यांच्यावर टीका होताना मी उत्तर दिले, असे ते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना उद्देशून म्हणाले. भाजप-शिवसेना ही नैसर्गिक आघाडी आहे. उरलेल्या लोकांनी ही युती तोडावी.

मंत्री संजय राठोड यांच्या विषयी बोलताना केसरकर म्हणाले, जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आरोपी आपण म्हणत नाही. त्यांनी बंजारा समाजावर अन्याय नको असे म्हटले. कायदेशीर प्रक्रियेनुसार जेव्हा चौकशी होईल तेव्हा त्यातून उत्तर मिळेल. तेव्हा मुख्यमंत्री निर्णय घेतली. पण तोपर्यंत चित्र वाघ म्हणतायत त्यानुसार त्यांनी पाठपुरावा करावा, असेही केसरकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT