Eknath Shinde इतक्या वेळा दिल्लीला गेले पण राज्यासाठी निधी नाही मागितला....

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष Jayant Patil यांची खोचक टीका!
Eknath Shinde, Jayant Patil
Eknath Shinde, Jayant Patilsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या. मात्र, महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी केंद्रसरकारकडे मदतीची काहीच मागणी केली नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त होते, असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, सत्कार सोहळ्यात व्यस्त न राहता मंत्र्यांनी जनतेच्या सेवेत लवकरात लवकर रुजू व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. १७ ऑगस्टपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरणार असल्याचे संकेत जयंत पाटील यांनी आज दिले. आज विधानभवनात विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना श्री. पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.

Eknath Shinde, Jayant Patil
नितीशकुमारांनी आपल्या पक्षातील 'एकनाथ शिंदे' ओळखला आणि भाजपलाच डच्चू दिला...

महाराष्ट्राच्या जनतेचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सभागृहात मांडणार असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असून अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी आहे. त्यामुळे अधिवेशन वाढवण्यात यावे अशी मागणी होती, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. गेल्या ४० दिवसापासून राज्याच्या अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात गोगलगायींचे आक्रमण वाढले आहे. मात्र, सरकार अजूनपर्यंत तिथे पोहोचले नाही, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

Eknath Shinde, Jayant Patil
video : एकनाथ शिंदेंच्या मदतीला जयंत पाटील धावले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com