Deepesh Mhatre News : कल्याण-डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. नगरविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांची नुकतीच बैठक पार पडली.
या बैठकीनंतर संबंधित इमारतींमधील नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला. मात्र या घोषणेनंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी नाव न घेता आमदार मोरे यांच्यावर निशाणा साधत श्रेयवादावर टीका केली. “या ६५ बेकायदा इमारतींमधील हजारो नागरिकांचे भविष्य अधांतरी आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक वेळा बैठका घेऊनही ठोस तोडगा निघालेला नाही,” असे ते म्हणाले.
“भाजप सुरुवातीपासूनच नागरिकांच्या पाठीशी उभी आहे. काही लोक केवळ श्रेय घेण्यासाठी चमकेशगिरी करत आहेत. प्रत्यक्षात दिलासा द्यायचा असेल, तर उल्हासनगरच्या धर्तीवर तातडीने जीआर काढावा,” असा टोला दीपेश म्हात्रे यांनी लगावला.
महापालिकेकडून वेळोवेळी नोटिसा बजावून कारवाईचा इशारा दिला जात असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी एका इमारतीवर कारवाईसाठी नोटीस पाठवण्यात आल्यानंतर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे सावट पसरले होते.
अशा परिस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीतून दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आले असले, तरी त्याबाबत कोणताही अधिकृत शासन निर्णय (जीआर) अद्याप जाहीर झालेला नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.