Vijay Wadettiwar : राजकारणात भूकंप? मंत्रिमंडळात ‘3 विकेट’ पडणार? अशोक खरात प्रकरणी वडेट्टीवारांचा स्फोटक दावा!

Vijay Wadettiwar on Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत असून या प्रकरणावरून आता विरोधकांकडून राज्य सरकारवर गंभीर आरोप होत आहेत. दरम्यान हे प्रकरण दाबण्यासाठी खरातचा एन्काऊंटर केला जाऊ शकतो, असा दावा केला जात आहे.
Ashok Kharat Case; Vijay Wadettiwar, sunil tatkare
Ashok Kharat Case; Vijay Wadettiwar, sunil tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  • विजय वडेट्टीवार यांनी खरात प्रकरणावर गंभीर आणि खळबळजनक दावे केले.

  • पेन ड्राइव्हमधून अनेक नेत्यांचा भांडाफोड होऊ शकतो, असा दावा केला.

  • काही नेत्यांना वाचवण्यासाठी मोठ्या हालचाली होत असल्याचा आरोपही केला.

Mumbai News : नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण धक्कादायक वळणावर आले असून विशेष तपास पथकाकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान खरातशी संबंध असल्याच्या कारणाने रूपाली चाकणकर यांच्या विकेट पडली असून आता प्रशासनात देखील मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात एसआरए डेप्युटी कलेक्टर अभिजित भांडे पाटील यांची बदली करण्यात आली आहे. तसेच भांडे यांची प्रतिनियुक्ती काढून घेतली आहे. अशोक खरातसोबत पत्नीने केलेली गुंतवणुकीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

यादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, या प्रकरणातील धागेदोरे थेट मंत्रिमंडळापर्यंत पोहोचले असून, पुरावे नष्ट करण्यासाठी खरातचा एन्काऊंटर देखील केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे आता उघड झाले असून त्याच्याविरोधात अर्धा डझनहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर त्याची बेनामी संपत्ती असल्याचेही आता उघड झाले आहे. याप्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार चढली असून राजकीय नेत्यांसह मंत्र्यांसोबत खरातचे फोटो समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.

Ashok Kharat Case; Vijay Wadettiwar, sunil tatkare
Vijay Wadettiwar Defamation Case : 100 कोटींचा दावा! भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये पुन्हा जोरदार 'भिडंत'

याआधीच या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी खळबळजनक दावा करताना खरातच्या चौकशीत वेगवेगळ्या नेत्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. तर हा भांडाफोड होऊ नये म्हणून खरातचा काटा संबंधित नेत्यांकडून काढला जाईल, संबंधित नेत्यांकडून खरातला संपविला जाण्याची भीती असल्याचा दावा केला होता. तसेच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात यांच्या जिवाचे रक्षण करावे अशी मागणी त्यांनी केली होती.

यानंतर आता वडेट्टीवार यांनी देखील असाच खळबळजनक दावा केला असून त्यांनी या प्रकरणातील धागेदोरे थेट मंत्रिमंडळापर्यंत पोहोचल्याचे म्हटले आहे. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी अशोक खरातचा एन्काऊंटर देखील केला जाऊ शकतो असा दावा केला आहे. यावेळी त्यांनी, या प्रकरणातील पुराव्यांवरून सरकारला घेरत, खरातचे लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि इतर साहित्य जप्त केल्याची माहिती सरकारने दिली आहे.

मग ते पेन ड्राईव्ह समोर का आणला जात नाही? त्यातील सत्य समोर आल्यास सगळे नागडे होतील. मंत्रिमंडळातील दोन तीन जणांची विकेट जाईल. कोणी कोणी खरातची पायापासून डोक्यापर्यत सेवा केली, हे समोर येईल. तसेच हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून यात वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतले आहेत. यामुळेच पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच खरातचा एनकाऊंटर देखील केला जाण्याची शक्यता वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली.

चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न

दरम्यान वडेट्टीवार यांनी तटकरेंवर निशाणा साधताना, चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न तटकरेंनीच केल्याचा आरोप केला आहे. दबाव वाढल्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र त्या अजून अनेक पदांवर कार्यरत आहेत. याचे कारण तटकरे. तटकरे जोपर्यंत ठरवत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावर पूर्ण कारवाई होणार नाही. तेच चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सध्या राष्ट्रवादीत सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोनच 'बॉस' असल्याचे म्हणत तेच या प्रकरणाचा निकाल लावतील, असाही आरोप त्यांनी केला आहे.

Ashok Kharat Case; Vijay Wadettiwar, sunil tatkare
Vijay Wadettiwar Video : रुपाली चाकणकरांना पाठींबा देणाऱ्या काँग्रेस नेत्यावर विजय वडेट्टीवार प्रचंड संतापले, 'वैयक्तिक संबंध..'

FAQs :

1. विजय वडेट्टीवार यांनी काय दावा केला?
पेन ड्राइव्हमधून अनेक नेत्यांचा भांडाफोड होईल असा दावा केला.

2. हा वाद कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे?
अशोक खरात प्रकरणाशी संबंधित आहे.

3. कोणत्या नेत्यांवर आरोप करण्यात आले?
सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप करण्यात आले.

4. एनकाउंटरचा दावा काय आहे?
काहींना वाचवण्यासाठी खरातचा एनकाउंटर होऊ शकतो असा दावा.

5. पुढे काय होऊ शकते?
या प्रकरणावरून मोठा राजकीय वाद आणि तपास तीव्र होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com