Rahul Narwekar  sarkarnama
मुंबई

Rahul Narwekar News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या नावाने पैशाची डिमांड; स्वीय सहायकाकडून...

Marine Drive Police Station : पोलिस संशियतांचा शोध घेत आहेत. पण, दिवसाढवळ्यात कंपनीच्या कार्यालयात जाऊन विधानसभा अध्यक्षांच्या नावाने पैसे मागितल्याने खळबळ उडाली आहे

Roshan More

Mumbai : आमदारांना परदेशी वारी घडवण्याचे कंत्राट असलेल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाने पैशाची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे पैशाची मागणी करणाऱ्यांनी थेट नार्वेकर यांना फोन केल्याचे नाटक केले. मात्र, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. या प्रकरणी राहुल नार्वेकर यांचे स्वीय सहायकाकडून मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rahul Narwekar News )

टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात दोन जण शिरले. या दोन्ही संशयितांनी कंपनी कर्मचाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narveka) यांच्या नावाने पैशांची मागणी केली.फोनवरून नार्वेकर यांच्या नावाने संशयितांनी एक जणाची कर्मचाऱ्याशी बोलणे देखील करून दिले. मात्र, कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी दोन्ही संशयितांनी कर्मचाऱ्यास धमकी देऊन तिथून पळ काढला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणाची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मिळताच त्यांनी याची गंभीर दखल घेतली. नार्वेकर यांच्या स्विय सहाय्यकाकडून तात्काळ मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस संशियतांचा शोध घेत आहेत. पण, दिवसाढवळ्यात कंपनीच्या कार्यालयात जाऊन विधानसभा अध्यक्षांच्या नावाने पैसे मागितल्याने खळबळ उडाली आहे.

राजकीय नेत्यांचे नावे धमकी देत पैसे उकळण्याचे उद्योग काही जण करत आहेत. मात्र, ज्या कंपनीला आमदारांना परदेशी वारी घडवण्याचे कंत्राट मिळाले आहे थेट त्या कंपनीत घुसून पैसे मागितले गेले ते सुद्धा विधानसभा अध्यक्षांच्या नावाने. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयितांचा शोध सुरू केला असल्याची माहिती आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT