NCP MLA Disqualification Case: शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीचा फैसला? राहुल नार्वेकर 'या' तारखेपर्यंत निकाल देणार

Ajit Pawar Vs Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी बुधवारी संपली, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच देणार निकाल
Ajit Pawar Vs Sharad Pawar
Ajit Pawar Vs Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरु होती. ही सुनावणी अखेर बुधवारी संपली. यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला शुक्रवारपर्यंत अंतिम लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने आपले लेखी म्हणणे मांडल्यानंतर या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष 15 फेब्रुवारीपर्यंत कधीही निकाल देण्याची शक्यता आहे. (NCP MLA Disqualification Case)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरु होती. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने याचिका दाखल केली होती. त्यानंतर 30 जानेवारीची तारीख देण्यात आली होती. पण विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar Vs Sharad Pawar
Maharashtra-Karnataka Border Dispute : मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सरकारला केंद्राची नोटीस; काय आहे कारण ?

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन्ही बाजूचा युक्तिवाद विधानसभा अध्यक्षांनी ऐकून घेतला. सुनावणीवेळी दोन्ही बाजूच्यावतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अखेर या प्रकरणाची सुनावणी बुधवारी संपली. आता दोन्ही गटाला अंतिम लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दोन्ही गटाकडून लेखी म्हणणे मांडण्यात आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 15 फेब्रुवारीपर्यंत कधीही निकाल देऊ शकतात. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देणार असल्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Ajit Pawar Vs Sharad Pawar
Prakash Ambedkar: महाविकास आघाडीचं घ्यायचं ठरलं, पण आंबेडकरांचं जायचं काही ठरेना; आता ठेवली 'ही' मोठी अट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com