Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News: गेल्या वेळी दांडी मारलेल्या अजितदादांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या स्नेह भोजनाला लावली हजेरी

Ajit Pawar Attends Shinde's Sneh Bhojan Program: या स्नेह भोजनाच्या माध्यमातून 'युती'चे नेते 'इंडिया' आघाडीच्या विरोधात रणनीती आखणार ?

Ganesh Thombare

Mumbai Politics News: सत्ताधारी भाजपला विशेषत: मोदी-शाहांना सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्रित मोट बांधत 'इंडिया' आघाडीच्या माध्यमातून आव्हान देत बैठकांचा धडाका लावला आहे. मुंबईत 'इंडिया'ची बैठक पार पडत असतानाच दुसरीकडे राज्यातील 'एनडीए' युतीची देखील मुंबईतच बैठक होणार आहे.

याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गुरुवारी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्नेह भोजनाला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही 'वर्षा'वर दाखल झाले आहेत. मात्र, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या विशेष स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाला दांडी मारणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी आवर्जून उपस्थित राहिले आहेत.

मुंबईत एकीकडे 'इंडिया' आघाडीची बैठक तर दुसरीकडे 'युती'ची बैठक असल्यामुळे मुंबईत मोठी' व्हीआयपी मूव्हमेंट' तयार झाली असून राजकीय बैठकांचा 'माहोल'च तयार झाला आहे. असे असतानाच गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या स्नेहभोजन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारमधील मंत्री उपस्थित होते. पण अजितदादांनी मात्र, दांडी मारल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले होते.

पण आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर आयोजित स्नेहभोजनाला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहिले आहेत. त्यामुळे सरकारमध्ये अजितदादा नाराज असलेल्या चर्चांवर आता पडदा पडणार आहे. या स्नेह भोजनाच्या माध्यमातून आता 'युती'चे नेते 'इंडिया' आघाडीच्या विरोधात काय रणनीती आखतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT