CM Shinde On Thackeray: 'इंडिया'च्या बॅनरवर कौरवांसारखे अनेक चेहरे, पण विजय पांडवांचा झाला होता; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

Political News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: विरोधी पक्षांची मोट बांधत एकत्र आलेल्या विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसूड ओढतानाच उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्यावर जोरदार आणि खणखणीत प्रत्युत्तर दिले. 'इंडिया'आघाडीत अनेक जण एकत्र आलेत. त्यामुळे त्यांच्या बॅनरवर कौरवांसारखे अनेक चेहरे आहेत. मात्र, विजय पांडवांचा झाला होता, हे विसरू नका, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंनी लगावला.

प्रवरा नगर येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी 'इंडिया' आघाडीकडे पंतप्रधान पदाचे अनेक चेहरे असल्याचे सांगत भाजपकडे एक चेहरा (नरेंद्र मोदी) वगळता दुसरा चेहरा आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला होता.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Beed Politics : कृषिमंत्री मुंडेंच्या पदरात अग्रीमचे 'क्रेडिट' तर नाहीच,पण नाराजीच अधिक...

यावर गुरुवारी प्रवरा नगर येथील आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट रामायणाचा दाखला देत अनेक चेहरे कुणाचे असतात आणि एकच चेहरा कुणाचा असतो असे सांगत, रावणाला अनेक चेहरे होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर बोचरी टिप्पणी केली.

रावणाला अनेक चेहरे होते कारण तो बहुरूपी, मायावी होता, असे सांगण्याचा प्रयत्न 'इंडिया' आघाडी बद्दल बोलताना शिंदेंनी केला. तसेच इकडे भाजपमध्ये मात्र एकच चेहरा आहे, आम्ही सर्व श्रीराम भक्त आहोत, असेही ते म्हणाले.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Mungantiwar On 'That' Statement : तुम्ही ट्विस्ट करू नका, व्यक्तीवर आधारित पक्ष, राजकारण आवडत नाही, असं मी म्हणालो !

'आग से मत खेलो, हात जल जायेंगे' असा फिल्मी डायलॉग एकनाथ शिंदे यांनी 'इंडिया' आघाडीला लगावला. कोणी कितीही एकत्र आले तरी 2024 च्या लोकसभेला जनता मोदी यांनाच मते देतील आणि मोदी साहेब पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com