INDIA Alliance News : भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी निघालेल्या 'इंडिया' आघाडीच्या वाटेत दहा काटे ? 'हे' पक्ष ठरू शकतात 'किंगमेकर'

Political News : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या दहा पक्षांनी मिळून 63 जागा जिंकत इंडियाच्या विजयात अडथळा निर्माण केला होता.
India Alliance
India AllianceSarkarnama
Published on
Updated on

New Delhi: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत इंडिया आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असून विविध मुद्द्यांवर चर्चाही केली जाणार आहे. मात्र, हे दहा पक्ष आतापर्यंत इंडियाच्या विजयातील अडथळे ठरले आहेत.

त्यामुळे या पक्षांच्या कामगिरीवर इंडियाला आतापासूनच लक्ष द्यावे लागणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या दहा पक्षांनी मिळून 63 जागा जिंकत इंडियाच्या विजयात अडथळा निर्माण केला होता. यातील तीन पक्ष एनडीएचे घटक पक्ष राहिले आहेत तर दोन पक्ष इंडियाच्याही सोबत होते.

India Alliance
Uddhav Thackeray News : सर्वत्र सामसूम राऊतांचाही उत्साह मावळला, उपराजधानीत उद्धव सेनेचे अस्तित्व काय?

लोकसभा(Loksabha Election) निवडणुकीची तयारी राजकीय पक्षाकडून जोरदारपणे सुरू आहे. त्यासाठी सर्वच राजकीय बैठकांचा जोर लावला जात आहे. मुंबईतील दोन दिवस २८ पक्षांचे ६५ नेते सहभागी होणार आहेत. इंडियाच्या पक्षाची पहिली बैठक पाटणा येथे झाली होती तर दुसरी बैठक जुलैमध्ये बेंगळूरु येथे पार पडली. त्यानंतर इंडिया(INDIA)कडून तिसरी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईमध्ये 31 ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी या पक्षाशी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आजपर्यंत या पक्षांच्या विजयात दहा प्रमुख पक्ष अडथळे आले आहेत. या पक्षांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६३ जागी विजय मिळवला होता. यामधील तीन मोठे पक्ष कधीकाळी एनडीए(NDA)चा घटक पक्ष होते तर जगमोहन रेड्डी यांची वायईसार काँग्रेस पार्टी दुसरी नवीन पक्ष आहे. तिसरा पक्ष म्हणजे के. चंद्रशेखर राव यांची तेलंगणा राष्ट्र समिती या तीन राज्यात ६३ लोकसभेच्या जागा आहेत. त्यामुळे या पक्षांच्या कामगिरीकडे लक्ष देऊन राहावे लागत आहे.

India Alliance
Rajnath Singh News : विरोधी पक्षांची 'इंडिया आघाडी' म्हणजे एक 'कुणबा' ; राजनाथ सिंह यांचा निशाणा

याशिवाय आणखी दोन महत्त्वाच्या पार्टी यामध्ये आहेत. त्यामध्ये ओवैसी यांचं एमआयएम तर बद्रुद्दीन यांची अजमल की ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंट हे प्रमुख पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांनी आजपर्यंत भाजपसॊबत सहभागी न होता वेगळ्या प्रकारे निवडणुका लढले आहेत.

याशिवाय उत्तर प्रदेशात मायावती यांचे बहुजन समाज पार्टी, पंजाबमध्ये बादल परिवाराचा अकाली दल तर चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगु देसम पार्टी आणि कर्नाटकात एच. डी. देवेगौडा यांचा जनतादर्शक कुलर आणि हनुमान बेनीवाल्यांचा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष हे पक्ष दोन्हीही इंडिया आणि इंडिया घटकाशी दूर अंतर ठेवून आहेत.

India Alliance
INDIA Meeting In Mumbai: 63 नेत्यांसाठी 30 लाखांच्या खुर्च्या अन् जेवणासाठी लाखो रुपयांचे प्लेट; 'इंडिया'च्या बैठकीवर कोट्यवधींचा खर्च ?

त्यामुळे या दहा पार्टीत जोपर्यंत इंडियाचा भाग बनणार नाहीत. तोपर्यंत इंडियाचा पक्ष विजयापासून दूर राहण्यास संघटक पक्ष असलेल्या टीडीपी यांनी इंडियाची चर्चा सुरू केली असून या दहा पार्टीमुळे जागा आगामी काळात इंडिया विजयात मोठे अडथळे निर्माण होणार आहेत. हे दहा पक्ष आगामी निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com