Mumbai News: श्रीनगर येथील एका २४ वर्षीय युवकाने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या तरुणाच्या विरोधात परेश चाळके यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचा व्हिडिओ त्यांने समाज माध्यमावर व्हायरल केला आहे. या तरुणाला अटक करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. हितेश भेंडे असे धमकी देणाऱ्या २४ वर्षीय तरुणाचे नाव आहे.
हितेश हा वारली पाडा येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. ठाण्यातील श्रीनगर पोलीस त्याचा शोध घेत असून अद्याप तो सापडलेला नाही.
एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी हितेशने इंस्टाग्राम वरून दिली. ठाण्यातील घरावर गोळीबार करणार असल्याचेही त्याने व्हिडीओत म्हटलेय. व्हिडीओमध्ये तरूणाने एकनाथ शिंदे यांना अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत हितेश भेंडे यांनी शिंदेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरावर गोळीबार करणार असल्याची धमकी हितेशने व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.