Pravin Darekar : अजित पवारांबाबतची विधाने सुरेश धसांनी टाळायला हवीत; दरेकरांचा सल्ला

Pravin Darekar advice to Suresh Dhas : सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असतानाच सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत अशा प्रकारची विधाने करणे टाळायला हवे होते, असा सल्ला भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
Pravin Darekar
Pravin Darekar sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 26 दिवस झाले आहेत. या हत्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे एसआयटीने हाती घेतल्यानंतर तपास कामाला वेग आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघे आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असतानाच सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत अशा प्रकारची विधाने करणे टाळायला हवे होते, असा सल्ला भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा निषेध व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मागणी केली जात आहे. यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चातून धस हे आरोप करीत असल्याने वातावरण तापले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमदार सुरेश धस यांना योग्य तो संदेश दिला असल्याचे दरेकर म्हणाले. एसआयटी ही मोठी तपास यंत्रणा आहे. जर सुरेश धस यांना काही महत्त्वाची आर्थिक माहिती मिळाली असेल, तर त्यांनी ती एसआयटीकडे सुपूर्द करायला हवी असेही दरेकर म्हणाले.

Pravin Darekar
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ गुरूवारी ग्रामपंचायतींमध्ये कामबंद आंदोलन! सरपंच परिषदेच्या मागण्या काय?

या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली गेली, तेव्हा वाल्मिक कराड आणि पोलिसांच्या संबंधांची कोणतीही माहिती नव्हती असे दरेकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना न्याय देतील. लाडक्या बहिणीलाही पैसे मिळतील, आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योग्य ती पावले उचलली जातील, असेही दरेकर म्हणाले.

Pravin Darekar
Santosh Deshmukh march : ना युती, ना आघाडी पुण्यातील सर्वच आमदार, खासदारांनी संतोष देशमुख यांच्यासाठी काढलेल्या मोर्चाकडे फिरवली पाठ

आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबात वक्तव्य केलं आहे. अजित पवार कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाहीत, अजित पवारांचं (Ajit Pawar) धनंजय मुंडे जवळ काय अडकलं आहे, असा सवाल त्यांनी भर सभेमध्ये उपस्थित केला होता. त्यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी परभणीत काढण्यात आलेल्या मोर्चात देखील सुरशे धस यांनी अजित पवार यांच्याबाबात वक्तव्य केल होते.

Pravin Darekar
Santosh Deshmukh : 9 जानेवारीला राज्यभरातील ग्रामपंचायती बंद! संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांबाबत सरपंच परिषदेने केली 'ही' मोठी मागणी

धस यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. या सुरेश धसांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी सुरेश धस यांच्यावर देखील टीका केली होती. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धसांना समज द्यावी, अशी मागणी देखील केली होती.

Pravin Darekar
BJP-UBT News: भाजप, ठाकरे गट एकत्र येणार ? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात मोठा 'ट्विस्ट'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com