Raj Thackeray Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Illegal loudspeakers Maharashtra : 'मुद्दा' राज ठाकरेंचा, 'लक्षवेधी' फरांदे यांची अन् 'आक्रमक' CM फडणवीस; या कालावधीत भोंगे बंदच राहणार!

MLA Devayani Farande Maharashtra CM Devendra Fadnavis illegal loudspeakers religious places : देवयानी फरांदे यांच्या लक्षवेधीनंतर सीएम देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना प्रार्थनास्थळीवरील अनधिकृत भोंग्यावर कारवाईचे आदेश दिले.

Pradeep Pendhare

Political news Maharashtra : लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रार्थनास्थळीवरील भोंग्याचा मुद्दा चांगलाच तापवला होता. हा मुद्दा आज विधिमंडळात तापला.

आमदार देवयानी फरांदे यांनी प्रार्थनास्थळीवरील अनधिकृत भोग्यांच्या आवाजावर लक्षवेधी मुद्दा मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक उत्तर देत सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांकडे बोट दाखवत, अनधिकृत भोंग्यांवर कारवाईचे संकेत दिले.

आमदार देवयानी फरांदे यांनी अनधिकृत भोंगे लावून ध्वनी प्रदूषणाबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केल्यानंतर अतुल भातखळकर यांनी देखील चर्चेत सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर देताना, प्रार्थनास्थळावरील भोंग्यांना परवानगी लागणार असून, नियमाच्या पालनाची जबाबदारी स्थानिक पोलिस (Police) ठाण्याच्या प्रमुखांवर असेल, असे सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार सर्व प्रार्थनास्थळावर भोंगे वाजविण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. रात्री 10 ते पहाटे 6 वाजेच्या वेळेत भोंगे बंद असले पाहिजे. विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबतीत असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल".

पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या भोंग्यांची परवानगी, नियमांच्या पालनाबाबत तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याचे निरीक्षकांवर राहणार आहे. याबाबत तक्रारी आल्यास आणि कारवाई न केल्यास संबंधित पोलिस निरीक्षकाला जबाबदार धरले जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नियम काय सांगतो?

राज्यात ध्वनी प्रदूषणाबाबत एकसूत्रीपणा येण्यासाठी पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 व ध्वनी प्रदूषण (विनियम व नियंत्रण) अधिनियम 2000 अन्वये कार्यवाही करताना प्रमाणित कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीनुसार सर्व प्रार्थनास्थळांवर तसेच इतर ठिकाणी भोंगे वाजविण्याबाबत ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे दिवसा 55 डेसिबल आणि रात्री दहा वाजेपर्यंत 45 डेसिबल आवाजाची मर्यादा आहे.

कारवाईसाठी असेल जबाबदारी

आवाजाची मर्यादा तपासण्याचे मशीन सर्व पोलिस ठाण्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच रात्री 10 ते पहाटे 6 वाजेच्या वेळेत भोंगे वापरावर बंदी आहे. याबाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे भोंगे जप्त करण्यात येतील. भोंग्याबाबत ध्वनी प्रदूषणाची तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. याबाबत पोलिस प्रशासनाकडून प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत कारवाई करण्याचे तक्रार अर्ज पाहणी अहवालासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. प्राप्त अहवालाची पडताळणी करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियमानुसार संबंधित न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT