Maharashtra Politics : विधानसभेत धोबीपछाड दिल्यानंतर एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर; पुढे काय घडलं..? (VIDEO)

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Maharashtra Budget 2025 Uddhav Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde Assembly : डीसीएम अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025 सादर केल्यानंतर विधानभवनात उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आमने-सामने आले होते.
Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Budget 2025 : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडला. अजितदादांनी लोकप्रिय घोषणांना बगल दिला असला, तरी विकासाचे ध्येय मांडण्यावर भर दिला. ज्या सभागृहात अर्थसंकल्प मांडला, त्याच्या बाहेरच एक मोठी राजकीय घडामोड काही क्षणात घडली.

उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे काही क्षणासाठी आमने-सामने आले होते. या क्षणात नेमकं काय घडतं, असं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले असतानाच, दोघांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं. उद्धव ठाकरे थांबलेले असतानाच, एकनाथ शिंदेंनी काहीशी नजर चुकवत, तिथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे न थांबना निघून गेले.

राज्याच्या राजकारण तीन वर्षांपूर्वी मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेनेत (Shivsena) बंड करत एकनाथ शिंदेंनी तिचा ताबा घेतला. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? यावरून लढा सुरू आहे. शिवसेनेपाठोपाठ शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील फूट पडली. अजित पवार आमदारांना घेऊन बाजूला झाले. आता एकनाथ शिंदे अन् अजित पवार महायुतीबरोबर असून राज्याच्या सत्तेत आहेत.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Dombivli RSS Branch Attack : 'RSS'च्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक; नेमका काय आहे प्रकार?

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज महाराष्ट्र राज्याचा '2025'चा अर्थसंकल्प मांडला. ज्या सभागृहात अजितदादांनी अर्थसंकल्प मांडला, त्याच सभागृहाबाहेर राज्याला काही क्षण थांबवेल, अशी मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'आमने-सामने' आले होते.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Top Ten News : माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या घरी 'ED'चा छापा, रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश... - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

फडणवीस-ठाकरेंचे हस्तांदोलन...

राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या प्रमुख सहकाऱ्यांसमवेत, विधान भवनात आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह ते विधान भवनातील सभागृहाच्या लाॅबीबाहेरून चालले होते. समोरून भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांना पाहून उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी थांबले. देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंकडे हात हस्तांदोलन केले. दोघांनी एकमेकांना हात जोडून नमस्कार देखील केला. हसतमुखाने एकमेकांशी हलकासा संवाद साधला.

ठाकरे अन् शिंदे आमने-सामने...

ठाकरे अन् फडणवीस यांची ही भेट होत असतानाच, फडणवीस यांच्या मागून शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. ठाकरे अन् शिंदे आमने-सामने येणार, असे अवघ्या महाराष्ट्राला वाटत असतानाच, शिंदेंनी काहीशी नजर बाजूला करत ठाकरेंकडे बघणे टाळले आणि फडणवीस यांच्या मागे न थांबता तेथून निघून गेले.

शिंदे अन् ठाकरेंचा एकमेकांविरुद्ध टीकेचा टोकाचा सूर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने विधानसभेत जोरदार कामगिरी करत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला चांगलाच धोबीपछाड दिला. त्यानंतर विधान भवनातील सभागृहाबाहेर ठाकरे अन् शिंदे एकमेकांसमोर आल्याचा क्षण घडला.

तत्पूर्वी म्हणजेच, कालच उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंनी 'बघायचा चॅनेलचा बूम अन् ठोकायची धूम', असे म्हणत जोरदार टीका केली होती. शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे अन् शिंदे यांची एकमेकांविरुद्ध टीकेचा सूर टोकाचा असाच राहिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com