Narendra Modi News
Narendra Modi News  Sarkarnama
मुंबई

Narendra Modi News : मुंबई मेट्रो, रस्ते, पालिकेच्या दवाखान्यासह पंतप्रधानांच्या हस्ते हजारो कोटींच्या कामाचे उद्घाटन

सरकारनामा ब्यरो

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज (19 जानेवारी) मुंबईत हजारो कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन झाले. त्यामध्ये मुंबई मेट्रो, मुंबईतील रस्ते, महानगपालिकेचे दवाखाने, तसेच पंतप्रधान स्वनिधीच्या कामांसह हजारो कोटींच्या विकास कामाचे उद्घाटन झाले.

मुंबईतील (Mumbai) बीकेसी मैदानावर झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी या विकास कामाचे उद्घाटन केले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल उपस्थित होते. तसेच केंद्रातील मंत्री आणि इतर राज्यातील मंत्री, यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.

पंतप्रधान यांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन झाले. तसेच मुंबईमध्ये सिमेटचे रस्ते होणार आहेत, त्याचेही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेतील २० नवीन दवाखान्यांचेही लोकार्पण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पुनर्विकास कामाचे भूमिपुजन करण्यात आले. महापालिकेच्या 7 मलजल प्रक्रिया केंद्रांचे भूमिपूजन, महानगरपालिकेच्या 3 रुग्णालयांच्या इमारतींचेही भूमिपूजन, पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत १ लाखाहून अधिक फेरीवाल्यांना कर्ज वितरणाचा शुभारंब यावेळी करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज तब्बल 38, 000 कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT