Devendra Fadnavis News: 20 वर्षे मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी फक्त स्वतःची घरं भरली; फडणवीसांची ठाकरेंवर टीका

Mumbai News : ''काही लोकांच्या बेईमानीमुळे आधीच्या डबल इंजिनच्या सरकारला ब्रेक लागला..''
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : ''काही लोकांच्या बेईमानीमुळे राज्यातील आधीच्या डबल इंजिनच्या सरकारला ब्रेक लागला. पण महाराष्ट्रातील जनतेने आता सर्वसामान्यांचे सरकार सत्तेत आणलं. 20 वर्षे मुंबई महापालिकेवर ज्यांनी राज्य केले त्यांनी फक्त स्वतःची घरं भरली'', असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज मुंबई (Mumbai) महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे भूमीपूजन करण्यात येत आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

Devendra Fadnavis
Jalna News : अधिकाऱ्यावर शाईफेक करणाऱ्या भाजप नगरसेवकाला एक वर्षाची कैद..

यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ''पंतप्रधान मोदी हे जगभरातील लोकप्रिय नेते आहेत. नरेंद्र मोदी यांच्यावर मुंबईकरांचे प्रेम आहे. मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत, त्यांनी विविध योजनांचे उद्घाटन केले आणि तेच भूमीपूजन देखील करत आहेत. सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) विकासाच्या दिशेने धावत आहे. मात्र, याआधी ज्यांची राज्यात सत्ता होती त्यांनी फक्त घरे भरण्याचे काम केले'', असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Teachers Constituency Election: शिक्षक मतदार संघात शिक्षकच आमदार असला पाहिजे; मंत्री चव्हाणांच्या विधानाने चर्चांना उधाण

''राज्यात आता जनतेचे सरकार आहे. मोदींनी २०१९ मध्ये म्हटलं होतं. पाच वर्षांच्या डबल इंजिनने विकासकामं केली. तशी पुढंही करू. मात्र, अडीच वर्षे जनतेच्या मनाचे सरकार बनू शकले नाही. त्यानंतर बाळासाहेबांचे खरे अनुयादी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनतर लोकांच्या मनातील सरकार राज्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रात फक्त विकासाचे काम होत आहे. या आधी 20 वर्षे मुंबई पालिकेवर ज्यांनी राज्य केले त्यांनी फक्त स्वतःची घरं भरली'', असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाव न घेता केला.

Devendra Fadnavis
Kasba Assembly By-Election : कसब्यात तीन दशकांनंतर इतिहास घडणार का? बापटांचा झाला होता पराभव...

दरम्यान, ३८ हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी मोदी हे मुंबईत दाखल झालेत. तसेच यावेळी एक लाखांपेक्षा जास्त फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज देखील वितरित केले जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com