थोडक्यात महत्वाचे :
रोहित पवार यांनी फडणवीस आणि अजित पवार यांचे जुने व्हिडीओ शेअर करत, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी सांगितले की सध्याची परिस्थिती पूर्वीपेक्षा भयानक असून, शेतकऱ्यांसाठी 15-20 हजार कोटींची मदत व कर्जमाफी आवश्यक आहे.
मराठवाड्यासह राज्यातील 2 हजारांहून अधिक गावे अतिवृष्टीमुळे प्रभावित असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
Demand for drought declaration : राज्याच्या अनेक भागाला सध्या पावसाने झोडपून काढले आहे. अनेक नद्यांना पूर आले असून हातातोंडाशी आलेली पीके वाहून गेली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसांत मराठवाड्यातील अनेक गावे, शहरे पाण्यात आहेत. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिक, शेतकऱ्यांना सरकारकडून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जुने व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. फडणवीस आणि अजितदादा विरोधी पक्षनेते असतानाचे हे व्हिडीओ आहेत. त्यावेळी त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.
रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री महोदय 2020 मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपण आणि अजितदादा 2022 मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपणही राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. पण आज त्यापेक्षाही भयानक परिस्थिती आहे.
देवाभाऊ आपल्या पाठीशी केंद्र सरकारची ताकद तर अजितदादा आपल्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यामुळं राज्यात थैमान घातलेल्या अस्मानी संकटातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी 15-20 हजार कोटींची मदत केली तर काही फरक पडणार नाही, असं मी म्हणतो आणि आपणही विरोधी पक्षनेते असताना म्हणाला होतात. प्रसंगी कर्ज घ्या पण संकटात असलेल्या आमच्या शेतकऱ्याला वाचवा, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.
आजच्या कॅबिनेट बैठकीत इतर सगळे विषय बाजूला सारून ओला दुष्काळ आणि सरसकट हेक्टरी 50 हजार मदत जाहीर करा. तसंच कर्जमाफीची हीच योग्य वेळ असल्याने याचीही आठवण ठेवा. राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे आपल्या आजच्या निर्णयाकडे लागलेत, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील तब्बल 2 हजारांहून अधिक गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. मागील 24 तासांत पावसाने झोडपून काढले आहे. पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी, नागरिकांच्या मदतीसाठी काही आमदार, खासदार, मंत्री पावसाच्या पाण्यात उतरले आहेत. पण सगळ्यांचे डोळे राज्य सरकार काय मदत जाहीर कऱणार, याकडे लागले आहेत.
Q1: रोहित पवारांनी काय मागणी केली आहे?
A: ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व कर्जमाफी जाहीर करण्याची.
Q2: त्यांनी कोणते व्हिडीओ शेअर केले?
A: फडणवीस आणि अजित पवार विरोधी पक्षनेते असतानाचे जुने व्हिडीओ.
Q3: मराठवाड्यात किती गावे प्रभावित झाली आहेत?
A: तब्बल २ हजारांहून अधिक गावे.
Q4: रोहित पवारांनी मदतीबाबत काय सुचवले?
A: किमान हेक्टरी ५० हजार मदत आणि प्रसंगी कर्ज घेऊनही शेतकऱ्यांना मदत करण्याची.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.