Mahavikas Aghadi, Mahavirat Morcha, Devendra Fadnavis
Mahavikas Aghadi, Mahavirat Morcha, Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis on MVA Morcha: '' आघाडीच्या मोर्चाला परवानगी,पण..'' ; गृहमंत्री फडणवीसांचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने येत्या 17 डिसेंबरला महाविराठ मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र, हा मोर्चा काही तासांवर येऊन ठेपला असताना देखील त्याला पोलिसांची परवानगी मिळालेली नव्हती. यावरुन राजकारण तापायला देखील सुरुवात झाली होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आघाडीच्या मोर्चाला परवानगी दिल्याची घोषणा केली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी देखील मोर्चाला परवानगी दिल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, या मोर्चाला परवानगी देण्यात पोलिसांनी काहीच अडचण असण्याचं कारण नाही. महाविकास आघाडीच्या महाविराट मोर्चाला परवानगी दिली आहे. महाविकास आघाडीने ठरलेल्या मार्गानुसारच हा मोर्चा काढावा. तो शांततेच्या मार्गाने निघावा. तसेच यावेळी कायदा सुव्यवस्था देखील पालन करण्यात यावं अशी सूचना देखील फडणवीस यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरूषांचा अवमान, सीमा प्रश्वावर भाजपशासित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची चिथावणीखोर भाषण, बेरोजगारी, महागाई यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तसेच विविध समविचारी पक्षांनी शनिवारी मुंबईत महाविराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ), काँग्रेस, राष्ट्रवादी, विविध डावे पक्ष, शेकाप, विविध संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला केला आहे.

जे. जे. रुग्णालयाजवळून हा मोर्चा निधेल व आझाद मैदानात त्याचा समारोप होणार आहे. आझाद मैदानाजवळ नेतेमंडळींची भाषणे होतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे हे उपस्थित राहणार आहेत.

मात्र, उध्दव ठाकरे, अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून महाविराट मोर्चाला पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे सरकारवर टीकेची झोड उठवली होती. तसेच पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी मोर्चा निघणारच असेही ठणकावून सांगितले होते. मात्र, आता फडणवीसांच्या परवानगीनमतर आघाडीच्या मोर्चाचा मार्ग मोकळा झाला आहे.

''सरकारमध्ये या मोर्चाला विरोध करण्याची हिंमत नाही...''

ठाकरे गटाचे नेेते व खासदार संजय राऊत यांनी महाविराट मोर्चाला पोलीस परवानगी न मिळाल्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला होता. राऊत म्हणाले,राज्यात आ णि देशात आंदोलन करण्यावर बंदी आली असेल तर सरकारने तसं जाहीर करावं. मोर्चांना परवानग्या नाकारून मागच्या नाही, पुढच्या दाराने कुणी आणीबाणी आणत आहे का? हा मोर्चा महाराष्ट्रप्रेमींचा आहे. विरोधी पक्षाचा मोर्चा नाही, असं सांगतानाच हा महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा असल्याने उद्याच्या मोर्चात सरकारमधील लोकांनीही सहभागी व्हावं असं आवाहन करतानाच सरकारमध्ये या मोर्चाला विरोध करण्याची हिंमत नाही असं स्पष्ट मत देखील व्यक्त केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT