Gram Panchayat Election: जानकरांची १५ वर्षांची सत्ता हिसकवण्यासाठी मोहिते पाटील गटाला दाखवावी लागणार ऐकी

मोहिते पाटील गटातील स्थानिक नेतेमंडळींच्या ऐन निवडणुकीत होणाऱ्या विसंवादाचा फायदा जानकर गट उठवतो आणि शेवटच्या टप्प्यात यशाचा चमत्कार होतो, असे मानणारा मोठा वर्ग वेळापुरात आहे.
Uttamrao Jankar-Vijaysingh Mohite Patil
Uttamrao Jankar-Vijaysingh Mohite PatilSarkarnama

अशोक पवार

वेळापूर (जि. सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) निवडणुका (Election) अंतिम टप्प्यात आल्या आहेत. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि सर्वात मोठ्या १२ हजार ८९६ मतदारसंख्या असलेल्या वेळापूर ग्रामपंचायतीमध्ये सत्तासंघर्ष शिगेला पोचला आहे. पारंपारिक मोहिते पाटील (Mohite Patil) गटाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वेळापूर (Velapur) ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी गेली तीन पंचवार्षिक सलगपणे सत्ता हस्तगत केली. तीन पंचवार्षिक सत्तेत असल्याने जानकर गट अँटी इन्कमबन्सीचा मुकाबला करत आपली राजकीय प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. दुसरीकडे मोहिते पाटील गटाने माजी जिल्हा परिषद सदस्य सतीशराव माने देशमुख, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक शंकरराव माने देशमुख, वेळापूर विकास सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख आदींच्या नेतृत्वाखाली आपली १५ वर्षांपूर्वी गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. (Mohite Patil-Jankar group will fight again in Velapur Gram Panchayat elections)

अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या वेळापूरच्या सरपंचपदासाठी उत्तमराव जानकर गटाच्या प.पू. डॉ. भाईनाथ महाराज पॅनेलचे युवा उमेदवार रजनीश बनसोडे आणि मोहिते पाटील गटाचे श्री अर्धनारी नटेश्वर पॅनेलचे अनुभवी बांधकाम व्यवसायिक भारत बनसोडे यांच्यामध्ये अटीतटीचा मुकाबला रंगला आहे. व्याख्याते, सामाजिक कार्यकर्ते सुनील ऊर्फ काका जाधव यांच्या नेतृत्वाखालील जनकल्याण ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या तिसऱ्या आघाडीने सरपंचपदासाठी माया उर्फ सदानाना रामचंद्र अडसूळ या तृतीयपंथीला मैदानात उतरवून तरंगफळ पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी सरपंचपदासह एकूण १७ सदस्य निवडीसाठी तिरंगी मुकाबला शिगेला पोहोचला आहे.

Uttamrao Jankar-Vijaysingh Mohite Patil
Sindhudurg News : भाजपची २५ वर्षांची सत्ता मोडीत काढण्यासाठी सर्वपक्ष आले एकत्र

उत्तमराव जानकर यांनी ग्रामपंचायतमधील सत्तेच्या पंधरा वर्षांपैकी तब्बल दहा वर्षे सरपंचपद स्वतः आणि त्यांच्या पत्नी तथा मावळत्या सरपंच विमलताई जानकर यांनी भूषविले आहे. यावेळी प्रथमच जानकर गटातर्फे त्यांच्या परिवाराबाहेरील उमेदवार सरपंचपदाचा चेहरा आहे. सत्तेच्या १५ वर्षात विविध कामे केल्याचे जानकर गटाकडून सांगितले जात आहे. मोहिते पाटील गटाने सत्ताधाऱ्यांच्या गेल्या पंधरा वर्षातील निकृष्ट, अर्धवट आणि न झालेल्या कामांकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी सत्ता परिवर्तनाची हाक दिली आहे.

Uttamrao Jankar-Vijaysingh Mohite Patil
Gram Panchayat Election : रत्नागिरीत शिंदे गटाला भाजपचे कडवे आव्हान; सरपंचासह एक ग्रामपंचायत बिनविरोध

जानकर गट सत्ता टिकविण्यासाठी तर मोहिते पाटील गट सत्ता परिवर्तनासाठी विजयाचे गणित जुळवत असताना तिसरी आघाडी कोणाचे गणित बिघडविणार की दोघांच्या सत्ता संघर्षात तरंगफळ पॅटर्न यशस्वी करणार याकडे तमाम तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Uttamrao Jankar-Vijaysingh Mohite Patil
Konkan News : भास्कर जाधवांचा भाजपवर मोठा आरोप; ‘पवारांना आलेल्या धमकीमागे भाजपचा हात शक्य’

मोहिते पाटील गटातील स्थानिक नेतेमंडळींच्या ऐन निवडणुकीत होणाऱ्या विसंवादाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा जानकर गट उठवतो आणि शेवटच्या टप्प्यात यशाचा चमत्कार होतो, असे मानणारा मोठा वर्ग वेळापुरात आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वेळापूर विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाच्या स्थानिक नेतेमंडळींनी एकत्र राहून सत्ता अबाधित राखली होती. त्याची पुनरावृत्ती झाली, तर सत्ताधारी आणि विरोधकांमधील अटीतटीचा संघर्ष अटळ आहे. या संघर्षात जानकर यांना माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईजे यांची साथ आहे, तर मोहिते पाटील गटातून इच्छुक असलेले परंतु चिठ्ठी टाकून नाव न निघाल्याने उमेदवारीपासून वंचित राहिलेले रिपाइंचे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्याही भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com